आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्ड पाकीटात ठेवले असले तरी चोरी होऊ शकतात खात्यातील पैसे, कसे ते जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वारंगलचे पोलिस आयुक्त डॉ. व्ही. रवींद्र यांनी आरएफआयडी सायबर फसवणूकीविषयी दिली माहिती
  • आरएफआयडी सायबर क्राइमद्वारे सहजपणे बँक खात्यातून पैसे काढता येतात

गॅजेट डेस्क - वारंगलचे पोलिस आयुक्त डॉ. व्ही.रविंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी नवीन आरएफआयडी (RFID)सायबर फसवणूक बाबत माहिती दिली आहे. ही फसवणूक कशी केली जाते आणि ती कशी टाळायची हे देखील सांगितले आहे. लोक अशाप्रकारच्या फसवणूकीचे शिकार होऊ नयेत यासाठी या व्हिडिओद्वारे ते लोकांना जागृत करत आहेत. या सायबर क्राइमद्वारे लोकांच्या बँक खात्यातून सहज पैसे काढले जातात.

काय आहे RFID सायबर फसवणूक


आरएफआयडीला रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेन्टिफिकेशन (RFID)म्हटले जाते. हे एटीएम कार्ड स्किमिंग आहे. नवीन कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सने दोन हजार रुपयांपर्यंतची शॉपिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पिनकोड किंवा ओटीपीची आवश्यकता नसते. कार्डला स्वाइप मशीनजवळ नेल्यावर पेमेंट होते. हे कार्ड निअर फील्ड कम्युनिकेशन (NFC)ला सपोर्ट करतात. यामुळे हे कार्ड वॉलेटमध्ये असल्यानंतरही याद्वारे सहजरित्या पेमेंट करता येते. या कारणामुळेच आपली देखील सहजरित्या सायबर फसवणूक होऊ शकते. 

आरएफआयडी एटीएम कार्ड स्किमिंग करणारे लोक स्वाइप मशीनला व्यक्तीच्या वॉलेटजवळ घेऊन जातात. मशीन 4 ते 5 सेंटीमीटर अंतरावरूनच त्या कार्डला कॅच करते. यानंतर मशीनमध्ये ठरावीक रक्कम टाकल्यानंतर पेमेंट केले जाते. अशाप्रकारची फसवणूक चालत्या-फिरत्या किंवा उभ्या असलेल्या लोकांसोबत होते. आरएफआयडी चिप रीडर बाजारात सहज उपलब्ध आहेत. 

एक्सपर्ट देखील अशा कार्डपासून धोका असल्याचे मानतात


सायबर सुरक्षेचे तज्ज्ञ पवन दुग्गल यांच्या मते, अशाप्रकारच्या कार्डद्वारे होणारी देवाण-घेवाण असुरक्षित होऊ शकते आणि सायबर फसवणूकीला प्रोत्साहन देऊ शकते. या कार्डबाबत अधिक स्पष्टता आणण्याची आणि ग्राहकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांनी या कार्डचा वापर विचार-विनिमय करून करावा. तर दुसरीकडे आयडीबीआय बँक, भोपाळचे डीजीएम श्रीजीत यांनी सांगितले की, "अशा कार्ड्समुळे सुरक्षेला धोका आहे. पिन कोडशिवाय किमान दोन हजार रुपये खरेदी करता येऊ शकतात. मात्र ही मर्यादा बँकेच्या अ‍ॅपद्वारे सेट केले जाऊ शकते."

अशी फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय

1. आपले डेबिट/क्रेडिट कार्ड अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा. हे RFID फ्रीक्वेंसी ब्लॉक करते. 
2. आपले डेबिट/क्रेडिट कार्ड RFID फ्रीक्वेंसीला ब्लॉक करणाऱ्या पाकिटात ठेवा.
3.RFID फ्रीक्वेंसी ब्लॉक करणाऱ्या पाकिटाचा वापर करा. 

बातम्या आणखी आहेत...