अयोध्या वाद / अयोध्या निकालाबाबत केंद्राचा सर्व राज्यांना सुरक्षेबाबत अलर्ट

१५ नोव्हेंबरपर्यंत निकाल, निकालाकडे देशाचे लक्ष

Nov 08,2019 08:03:00 AM IST

नवी दिल्ली - अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी शांतता आणि सद््भाव टिकून राहावा म्हणून केंद्राने राज्य सरकारांना सतर्कतेचे निर्देेश दिले आहेत. गृहमंत्रालयाने राज्यांना सूचना केली असून कुठेही अप्रिय घटना घडता कामा नये, असे बजावले आहे.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत पुरेसा बंदाेबस्त ठेवण्यासोबतच तेथील प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. निकालापूर्वी लाखो भाविक अयोध्येत दाखल होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर उप्र सरकारला सतर्कतेचे आदेश देण्यात आले.

१५ नोव्हेंबरपर्यंत निकाल

> सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीपूर्वी १५ नोव्हेंबरला निकाल अपेक्षित.निकालाकडे देशाचे लक्ष.

> सरकारच्या आदेशानंतर द्वेष पसरवणारे २० लाख ग्रुप, अकाऊंट व्हाटस्अपने बंद केले.

> फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, सिग्नल या अॅपवरही नजर.

X