आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ali Fazal Completed His Shooting Before Time For Celebrating Eid With Family In Lucknow

कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी अलीने लवकर पूर्ण केले शूटिंग, लखनऊमध्ये साजरा करणार सण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ईदच्या सणासाठी प्रत्येकाला आपल्या घरी पोहोचण्याची घाई असते. बॉलिवूडमध्ये काम करणारे सेलेब्सदेखील या या सणासाठी इतकेच उत्सुक आणि आतुर असतात. असेच काही अली फजलच्या बाबतीत झाले. तो मुंबईमध्ये आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. मंगळवारी त्याने सर्व प्रोजेक्ट्सचे शूटिंग ठरलेल्या वेळेच्या आत पूर्ण केले. त्यानेअसे यासाठी केले जेणेकरून त्याला कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी त्याच्या घरी लखनऊला जात यावे. 

 

लखनऊमध्ये राहते फॅमिली... 
अलीचे संपूर्ण कुटुंब लखनऊमध्ये राहते आणि सामान्यतः अलीला जसा वेळ मिळतो तास तो लखनऊला पोहोचतो. विशेषतः समारंभ आणि सणाच्यावेळी तो आवर्जून लखनऊला जातो. येथे अलीने आपले बालपण घालवले आहे आणि आपले प्राथमिक शिक्षणदेखील येथूनच पूर्ण केले आहे. सुट्ट्या संपल्यावर तो प्रत आपल्या प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे.