आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांविषयी आलिया-पूजा यांनी केला हा खुलासा, सांगितले- कशामुळे वडिलांना घाबरतात दोघी बहिणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आपल्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत महेश भट यांनी त्यांच्या गाजलेल्या 'सडक' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. 'सडक 2'मध्ये आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर लीड रोलमध्ये असून चित्रपटात संजय दत्त आणि पूजा भट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतली. अलीकडेच आलिया आणि पूजा भट यांनी वडील महेश भट यांच्याविषयीच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघड केल्या. वडिलांच्या एका गोष्टीमुळे दोघी बहिणी खूप घाबरल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.


अखेर असे काय केले होते महेश भट यांनी...  
- आलिया आणि पूजा भट त्यांच्या वडिलांच्या काही गोष्टी बघून घाबरतात. कधी कधी आमच्या वडिलांकडे सुपर पॉवर असून त्यांना इतरांच्या मनात काय सुरु आहे, हे समजून जाते, असे पूजा भट म्हणाली. पूजाने पुढे सांगितले, "एकदा सकाळी मी माझ्या बॉसचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याच्या कॅप्शनविषयी विचार करत होते, तेव्हा माझ्या वडिलांनी तेच कॅप्शन मेसेज केले, जे माझ्या विचारात होते. क्षणभर मी घाबरले. कारण जे माझ्या डोक्यात सुरु होते, ते त्यांनी सांगितले होते." तर आलिया म्हणाली, वडिलांच्या या सुपरपॉवरमुळे कधी कधी मायक्रोस्कोपजवळ बसल्याचा मला भास होतो.  


आलिया भट म्हणाली, वडिलांसोबत काम करण्याचा कधी विचार केला नव्हता. 
- आलिया भटच्या मते, 'सडक 2' हा तिच्या करिअरमधील मोठा टर्न ठरु शकतो. कारण कधी वडिलांच्या दिग्दर्शनात काम करण्याचा विचार तिने केला नव्हता. त्यांच्या चित्रपटात काम करणे हे माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचे आलिया म्हणाली. एका मुलाखतीत आलियाने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत वडील महेश भट आणि तिच्या नात्यात बरीच सुधारणा झआली आहे. बालपणापासून वडिलांना कायम कामात व्यस्त पाहिले, पण गेल्या दोन वर्षांत ते आम्हाला वेळ देऊ लागले आणि आमचे म्हणणे ऐकून घ्यायला लागले, असे आलियाने सांगितले.


वडिलांना शिक्षक मानते पूजा भट... 

-  पूजा भटच्या मते, तिचे वडील महेश भट एका शिस्तप्रिय शिक्षकाप्रमाणे आहेत. इंडस्ट्रीत अनेक लोक आपल्या वडिलांना शिक्षणस्थानी बघत असल्याचे पूजाने सांगितले. ती म्हणते, संजय दत्तसह अनेक लोकांनी महेश भट यांच्या आजूबाजुला राहून कठीण प्रसंगाला तोंड देणे शिकले आहे.  


थोरल्या मुलीला महेश भट यांनी केले होते लाँच... 
- थोरली कन्या पूजा भट हिला महेश भट यांनी बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 1989 मध्ये पूजाचा पदार्पणातील पहिला चित्रपट 'डॅडी' हा महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. तेच याचे निर्मातेसुद्धा होते. तर धाकटी कन्या आलिया भट हिला करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनच्या 'स्टूडंट ऑफ द इयर'मधून लाँच केले होते. दिग्दर्शक म्हणून महेश भट यांना 'कारतूस' हा शेवटचा चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला होता. 'सडक 2' द्वारे ते सुमारे 19 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात परतत आहेत. हा चित्रपट 2020मध्ये रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...