• Home
  • News
  • Alia becomes the most beautiful Asian Woman of 2019

यश / आलिया बनली 2019 ची सर्वात सुंदर एशियन वुमन

लंडनचे साप्ताहिक ‘ईस्टर्न आय’ने हे केले सर्वेक्षण 

दिव्य मराठी

Dec 13,2019 11:15:00 AM IST

आलिया भट्‌टची एका सर्वेक्षणामध्ये २०१९ ची आशियाची सर्वात सुंदर महिला म्हणून निवड करण्यात आली आहे. लंडनचे साप्ताहिक ‘ईस्टर्न आय’ने हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ऑनलाइन व्होटिंगच्या माध्यमातून सर्वात सुंदर महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. सेक्सिएस्ट वुमनचा किताब जिंकल्यानंतर आलिया म्हणाली, ‘जे खरे सौंदर्य दिसते, त्यापेक्षा ते ते कितीतरी जास्त असते, असे मला वाटते. आम्ही म्हातारे होणार आहोत. आम्ही कसे दिसतो यात काळानुसार बदल होईलच. मात्र, तुम्ही मनाने चांगले असणे हेच तुमचे खरे सौंदर्य आहे. आपण सर्वांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.’


आलिया भट्टच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास या वर्षी तिचे दोन चित्रपट ‘कलंक’ आणि ‘गली बॉय’ आहेत. पैकी ‘गली बॉय’ची २०२० ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे.

X
COMMENT