आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांच्या मुलीने आलिया भट्टला हरवले, \'घर मोरे परदेसिया\' गाण्यावर केले कथक, आपल्या नृत्याने सर्वानाच केले मंत्रमुग्ध 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोशल मीडियावर 'सुपर डांसर 3' चा प्रोमो शेयर केला गेला आहे, ज्यामध्ये 6 वर्षांची मुलगी आलिया भट्टचे गाणे 'घर मोरे परदेसिया' वर कथक करत आहे. मुलीचा डान्स पाहून तिथे असलेल्या आलिया आणि सोनाक्षी सिन्हादेखील हैराण झाल्या. डान्स पाहून सोनाक्षी रुप्साचे खूप कौतुक करते आणि म्हणते, "6 वर्षांच्या वयात तू जे केले आहेस ते चांगल्या चांगल्या लोकांना करता येत नाही." मात्र नंतर आलियाने देखील त्या मुलीसोबत न राहवून डान्स केलाच. त्यानंतर रुप्सादेखील तिच्यासोबत बरोबर स्टेप्स करताना दिसत आहे.

या विकेंडला शो होणार आहे विशेष...

सध्या 'कलंक' ची स्टारकास्ट फिल्मच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या विकेंडला आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा डान्स रिएलिटी शो 'सुपर डांसर 3' च्या मंचावर फिल्मच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या. ज्यामुळे हा एपिसोड खूप विशेष होणार आहे. ही फिल्म धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनली आहे. यामध्ये आलिया, सोनाक्षी यांच्याबरोबरच संजय दत्त, माधुरी दीक्षित, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ही फिल्म 19 एप्रिलला रिलीज होणार आहे.