Home | Gossip | alia bhat and sonakshi sinha reach chanderi for film's shooting

मध्यप्रदेश : आलिया आणि सोनाक्षी 'कलंक' च्या शूटिंगसाठी पोहोचल्या चंदेरीला, एयरपोर्टवर झाल्या स्पॉट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 10, 2019, 12:08 AM IST

बॉलिवूडमध्ये वाढली चंदेरीला मागणी, एका वर्षाच्या आत तीन चित्रपटांची झाली आहे शूटिंग...

  • alia bhat and sonakshi sinha reach chanderi for film's shooting

    एंटरटेन्मेंट डेस्क : रविवारी संध्याकाळी 6 ते 6.30 दरम्यान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्ट भोपाळ एयरपोर्टवर स्पॉट झाल्या. सूत्रांनुसार आलिया आणि सोनाक्षी एयरपोर्टहुन सरळ आपली फिल्म 'कलंक' च्या शूटिंगसाठी चंदेरीला रवाना झाल्या. त्या दोघी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याची शूटिंग सोमवारपासून सुरु झाली आहे. यानंतर फिल्मचे पुढचे शेड्यूल ललितपुरमध्ये होणार आहेत.


    'कलंक' फिल्मचे निर्माण करन जौहरचे धर्मा प्रोडक्शन करत आहे. यामध्ये लीड रोलमध्ये वरुण धवन आहे, सोबतच फिल्ममध्ये खूप दिवसानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करणार आहे. काही दिवसातच 'कलंक' ची पूर्ण स्टारकास्ट आणि टीम चंदेरीला पोहोचणार आहे.
    बॉलिवूडची चंदेरी आता देशातील सर्वात चांगल्या शूटिंग लोकेशनमधील एक झाले आहे. जिथे एका वर्षांच्या आत अनेक चित्रपटाचे शूटिंग होत आहे. यामध्ये राजकुमार रावची 'स्त्री', वरुण धवनची 'सुई धागा' आणि कंगना रनोटची नवी फिल्म सामील आहे.

Trending