आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलीय भट्टने आपल्या ड्रायव्हरला घर खरेदी करण्यासाठी दिले 50 लाख रुपये, जुहूमध्ये बुक करून दिला प्रशस्त फ्लॅट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आलीय भट्टची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही आत्तापर्यंत यशस्वीच राहिल्या आहेत. तिच्या फिल्म्समुळे असो किंवा तिच्या पर्सनल लाईफमुळे असो ती नेहमीच चर्चेत असते. रणबीर कपूर सोबतच्या तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे ती खास चर्चेत असते. पण आता आणखी एका गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे.  

आलियासाठी काही लोक तिच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. परंतु अशा आणखी काही व्यक्ती आहेत ज्या तिच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. आणि ते म्हणजे तिचा ड्रायव्हर सुनील आणि हेल्पर अमोल. आलियाने करिअरला सुरवात केल्यापासून हे दोघे तिच्या सोबत आहेत. त्यामुळेच तिने सुनील आणि अमोल यांना तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकी 50-50 लाख रुपये घरासाठी दिले आहेत. 

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या आपली फिल्म 'कलंक' चे प्रमोशन करत आहे. फिल्मचा टीजर रिलीज झाला आहे. तसेच एक गाणेही रिलीज झाले आहे. आलियासोबत फिल्ममध्ये वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...