आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेशनः रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया भटने स्वतः बनवला केक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता रणबीर कपूरने 28 सप्टेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. यंदाचा रणबीरचा वाढदिवस अतिशय स्पेशल ठरला. कारण आहे त्याची सध्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आलिया भट. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आलियाने रणबीरसाठी स्वतः एक खास केक बनवला. केक बनवतानाचे काही फोटोज आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तत्पूर्वी तिने इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीरचा एक फोटो पोस्ट करुन हॅपी बर्थडे सनशाइन असे कॅप्शन दिले.

 

'ब्रह्मास्त्र'मध्ये सोबत झळकणार....
रणबीर आणि आलियाच्या अफेअरच्या बातम्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्यापासून चर्चेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटातून आलिया आणि रणबीर ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 19 ऑगस्टला रिलीज होणार आहे.  


पुढील स्लाईड्सवर बघा, आलियाने शेअर केलेले खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...