आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्याने ग्रासलेल्या बहिणीविषयी बोलताना आलियाला अश्रू अनावर, म्हणाली - पुस्तक वाचल्यानंतर समजले ती कुठल्या अडचणींचा सामना करतेय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री आलिया भटने रविवारी मुंबईत पार पडलेल्या 'वी द वीमेन' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अचानक आलियाला अश्रू अनावर झाले होते. तिच्या या भावूक क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आलियासोबत तिची थोरली बहीण शाहीन दिसतेय. या कार्यक्रमात आलिया शाहीनच्या 'आय हॅव नेवर बीन अनहॅप्पीयर' या पुस्तकाविषयी बोलताना दिसतेय. याच पुस्तकाविषयी बोलताना तिला अश्रू अनावर झाले. या पुस्तकात शाहीनने तिला डिप्रेशनमध्ये असताना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले होते, ते लिहिले आहे.    
पुस्तक वाचल्यानंतर समजली शाहीनची अवस्था...
आलियाने या इव्हेंटमध्ये कबुली दिली की, संपूर्ण आयुष्य आपल्या बहिणीसोबत घालवल्यानंतरदेखील डिप्रेशनच्या काळात तिची अवस्था नेमकी काय होती, ते पुस्तक वाचल्यानंतर मला समजले. एक बहीण म्हणून मी कमी पडले. मी तिला पूर्णपणे समजू शकली नाही. 
आलिया पुढे म्हणाली, "माझ्या मते, ती माझ्या कुटुंबातील सर्वात प्रतिभावंत सदस्य आहे. ती मात्र असे समजत नाही. मी तिला जेवढे समजून घ्यायला हवे होते, तेवढे मी करु शकली नाही, म्हणून मी स्वतःला दोषी समजते." 

  • आलियाने इंस्टाग्रामवर शेअर केल्या भावना...

अलियाने इंस्टाग्रामवर शाहीनच्या पुस्तकाचा उल्लेख केला. तिने लिहिले, "बहिणीच्या पहिल्या पुस्तकाविषयी व्यक्त होणा-या भावना शब्दांत मांडता येत नाही. शाहीन तू प्रतिभावंत आहे. आय लव्ह यू"

  • वयाच्या 12 वर्षीपासून डिप्रेशनने पीडित आहे शाहीन...

शाहीन वयाच्या 12 व्या वर्षीपासून डिप्रेशनमध्ये आहे.  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ती डिप्रेशनविषयी मोकळ्यापणाने बोलली होती. डिप्रेशनमुळे अनेकदा आत्महत्येचा विचार मनात आल्याचे तिने सांगितले होते.