आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt Ex Boyfriend Sidharth Malhotra Crazy Female Fan Wants To Take Him To Kolkata

या महिलेला आलिया भटच्‍या 'एक्‍स बॉयफ्रेंडला' कोलकाताला घेऊन जाण्‍याची इच्‍छा, त्‍यासाठी ऑफिसमध्‍ये घातला गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आलिया भटचा माजी प्रियकर तथा बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची एक सरफिरी चाहती समोर आली आहे. ही चाहती खास करून सिद्धार्थला नेण्‍यासाठी कोलकाताहून मुंबईला आली आहे. खरं तर सिद्धार्थने आपल्‍या मुलांच्‍या कार्यक्रमात यावे अशी या लेडी फॅनची इच्‍छा आहे. यासाठीच सदरील महिला माउंट मैरी रोड (बांद्रा) स्थित सिद्धार्थच्‍या जुन्‍या घरी पोहृोचली. तेथील सुरक्षा रक्षकाकडून तिने सिद्धार्थच्‍या ऑफिस आणि नव्‍या घराचा पत्‍ता मिळविला. त्‍यानंतर ती चाहती सिद्धार्थच्‍या मॅनेजमेंट कंपनीच्‍या ऑफिस मध्‍ये गेली. तिथे तिने बराच गोंधळ घातला. दरम्‍यान सिद्धार्थ फिल्म 'जबरिया जोड़ी' चित्रपटाच्‍या चित्रीकरणात व्‍यस्‍त असल्‍यामुळे तो सदर महिलेला भेटू शकला नाही. परंतु, ती महिला सारखी त्‍यांच्‍या बिल्डिंगच्‍या खाली सिद्धार्थ घरी परत येण्‍याची वाट पाहत होती. सिद्धार्थला घेतल्‍याशिवाय मुंबईहून परत जाणार नाही आणि मी त्‍यांच्‍याशी समोरासमोर बोलु इच्छित असल्‍याचे तीचे म्‍हणणे आहे. 


जेव्‍हा सिद्धार्थची होते चपलेने धुलाई 

- 'स्टूडेंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून आपल्‍या बॉलीवुड करियरला सुरूवात करणारा अभिनेता सिद्धार्थला पहिला ब्रेक मिळविण्‍यासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती.।

- सिद्धार्थने 18 व्‍या वर्षापासुन मॉडलिंग करण्‍यास सुरूवात केली होती. परंतु एवढ्यावरच तो समाधानी नव्‍हता. याच दरम्‍यान फिल्ममेकर करण जोहरने त्‍याला आपल्‍या  'माय नेम इज खान' या चित्रपटात 'को-डायरेक्टर' म्‍हणून काम करण्‍याची संधी दिली.

- नंतर करण जोहर यांनीच सिद्धार्थला 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मध्‍ये आलिया भट्ट आणि वरुण धवन सोबत संधी दिली. दिल्लीहुन शिक्षण घेणारा सिद्धार्थ आपल्‍या शालेय जीवनात तितका हुशार नव्‍हता. सिद्धार्थचे वडील हे नेव्‍ही मध्‍ये कर्मचारी आहेत.

- सिद्धार्थने एका मुलाखती दरम्‍यान सांगितले की, ''मी अभ्‍यासाच्‍या बाबतीत खूपच कच्‍चा होतो. आमच्‍या घरात अभ्‍यासाला खूपच महत्‍व दिले जाते. 9 वीत असतांना जेव्‍हा मी नापास झालो होतो तेव्‍हा माझ्या आईने मला चपलीने मारले होते.''  

- सिद्धार्थने आतापर्यंत आपल्‍या कारकिर्दीत रोमांटिक कॉमेडी 'हसी तो फसी', 'एक विलेन', 'कपूर अँड सन्‍स', 'ब्रदर्स', 'ए जेंटलमेन', 'इत्तेफाक' आदी चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्‍या आहेत.

- 'एक विलेन' चित्रपटातील दर्जेदार अभिनयासाठी सलमान खानने सिद्धार्थला एक डिजाइनर घड्याळ भेट दिली होती. चित्रपटांव्‍यतिरिक्‍त सिद्धार्थ विविध ब्रँड्सच्‍या जाहिराती करतो. ज्‍यामध्‍ये 'कोका कोला', 'कॉरनेटो', 'अमेरिकन स्वान' आणि ओप्पो सहभागी आहेत. सिद्धार्थ 'टूरिज्म न्यूजीलैंड'चा पहिला इंडियन एंबेसेडर सुद्धा आहेत. 

बातम्या आणखी आहेत...