आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट अशातच आपली फिल्म 'कलंक' ला प्रमोट करण्यासाठी 'द कपिल शर्मा शो' च्या सेटवर पोहोचली. रिपोर्ट्सनुसार, शोमध्ये ती तेव्हा नाराज झाली, जेव्हा बच्चा यादवचा रोल करत असलेल्या कीकू शारदाने ती आणि तिचे वडिल महेश भट्ट यांच्यावर काही जोक ऐकवले. यावेळी आलियाने मोकळेपणाने नाराजी व्यक्त केली नाही, पण सेटवर ज्या पद्धतीने ती शांत बसून होती, ते पाहून अंदाज लावला जात आहे की, ती कीकूच्या जोक्समुळे अपसेट होती.
कीकूने ऐकवले असे जोक्स...
नेहमीप्रमाणे कीकू शारदाने 'कलंक' च्या टीमसमोर जोक्सचे भांडार उघडले. यादरम्यान त्याने आलिया भट्टला विचारले, 'स्कूटर कसा आवाज करते ?' जेव्हा आलियाने विचारले, 'कसे ?' तेव्हा उत्तरात कीकू म्हणाला, 'भट्ट, भट्ट, भट्ट, भट्ट.' हे ऐकून सर्वच लोक हसू लागले. यांनतर कीकूने विचारले, 'महेश भट्ट कंस्ट्रक्शनचा बिजनेस करतात का ?' यावर आलिया म्हणाली, 'नाही, का ?' यावर कीकू म्हणाला, 'कारण 'फुटपाथ, सडक', सर्व तेच तर बनवतात.' कीकूचे जोक्स 'कलंक' च्या संपूर्ण टीमने एन्जॉय केले. पण सांगितले जात आहे की, आलिया भट्टला हे आवडले नाही. याव्यतिरिक्त वरुण धवननेदेखील सर्वांची खूप मज्जा घेतली. यामुळे पूर्णवेळ आलिया काहीशी अपसेट दिसली.
सोनाक्षी आणि आदित्यदेखील सेटवर होता...
कपिलच्या शोमध्ये 'कलंक' ची टीममधून आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हादेखील पोहोचले होते. हा स्पेशल एपिसोड याच वीकेंडला टेलीकास्ट केला जाईल. अभिषेक वर्मनच्या डायरेक्शनमध्ये बनलेली फिल्म 'कलंक' मध्ये माधुरी दीक्षित, संजय दत्त, कुणाल खेमू आणि कियारा आडवाणीयांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. फिल्म 17 एप्रिलला रिलीज होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.