आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt Gets Mobbed On Airport Boyfriend Ranbir Kapoor And Friend Ranveer Singh Protect Her: Ranveer Singh Gets His Revenge From Ranbir Kapoor Meme Viral On Social Media

आलिया भटला गर्दीतून सुरक्षित ठेवताना दिसला तिचा बॉयफ्रेंड, चाहते सेल्फी घेत होते तर केयरिंग बॉयफ्रेंड रणबीरसोबत रणवीरनेही एयरपोर्टवर केले प्रोटेक्ट, 6 वर्षांनंतर रणवीरने घेतला रणबीरचा सूड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणबीर कपूर आणि आलिया भटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर एका प्रोटेक्टिंग बॉयफ्रेंडप्रमाणे आलियाची काळजी घेताना दिसतोय. हा व्हिडिओ एयरपोर्टवरील आहे, येथून बाहेर पडताना आलियाला अडचण येत होती. अशा वेळी रणबीर गर्लफ्रेंड आलियाला या गर्दीतून बाहेर काढताना दिसला. आलियाविषयी रणबीरचा केअरिंग स्वभाव लोकांना खुप आवडतोय. खरेतर आलिया आणि रणबीर कपूर नुकतेच करण जोहर, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, विक्की कौशल, एकता कपूर, भूमी पेडनेकर, सिध्दार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनसोबत दिल्लीला गेले होते. विशेष म्हणजे हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी एकत्र दिल्ली येथील पंतप्रधान कार्यायलात गेले होते. यादरम्यान आलिया भट आणि रणबीर कपूर एकत्र दिसले. हे सर्व स्टार्स दिल्ली एयरपोर्टवरुन बाहेर पडले तेव्हा एवढ्या अॅक्टर्सला एकत्र पाहून तिथे खुप गर्दी झाली. अनेक चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यांना घेरले. तेव्हाच रणबीरसोबत रणवीर सिंहही आलियाला चाहत्यांपासून बचाव करत कारमध्ये बसवताना दिसला. 

 

ranveer singh finally gets his revenge 👀😂 pic.twitter.com/lsb4YFfWBZ

— zara (@princessxbhatt) January 10, 2019

रणवीरने घेतला पुर्ण सूड 
- रणबीर कपूर, आलिया भट आणि रणवीर सिंह यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर लोक कमेंट करत होते की, रणवीरने आपला पुर्ण सूड घेतला. 
- खरेतर 6 वर्षांपुर्वी जून 2013 मध्ये रणबीर-दीपिका (रिलेशनशिपमध्ये होते) प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या फ्यूनरलमध्ये गेले होते, तेव्हाचा एक फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये रणवीर वियर्ड पध्दतीने रणबीर-दीपिकाला पाहत होता. सेम तसाच सीन पुन्हा एकदा दिल्ली एयरपोर्टव क्रिएट झाला. 
- या दरम्यान आलिया, रणवीरसोबत उभी होती अशा वेळी रणबीर कपूर वियर्ड पध्दतीने दोघांना पाहताना दिसला. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहे की, रणवीरने आपला सूड पुर्ण केला आहे. 
- सध्या आलिया भट रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर तिचा 'गली बॉय' लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये आलिया, रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर करतेय. 

 

लाखो रुपये खर्च करुन दिल्लीत पोहोचले स्टार्स 
- दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद मोदींना भेटण्यासाठी आलिया भट, रणबीर कपूर, करण जोहर, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, विक्की कौशल, एकता कपूर, भूमी पेडनेकर, सिध्दार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनसोबतच जवळपास 15 पेक्षा जास्त स्टार पोहोचले होते. 
- सर्व स्टार्स मुंबई ते दिल्ली प्रायव्हेट प्लेनने पोहोचले होते. अशा वेळी स्टार्ससाठी 2 प्रायव्हेट प्लेन करण्यात आले होते. 6 सीटर प्लेनचे भाडे 12 लाख रुपये तर 10 सीटरचे भाडे 38 लाख रुपये होते. असे पाहिले तर स्टार्सच्या फक्त जाण्याच्या प्रवासावर 50 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च झाले. 


 

 

बातम्या आणखी आहेत...