आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गली बॉय'चा ट्रेलर पाहिल्यानंतर वडील महेश भटची रिअॅक्शन पाहून नाराज होऊ शकते आलिया भट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि आलिया भटचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. जोया अख्तरच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंह आणि आलिया भटच्या भूमिकांचे खुप कौतूक होत आहे. चित्रपटामध्ये आलिया भटने एका मुस्लिम मुलीची भूमिका साकारली आहे, ती खुप फटकळ स्वभावाची आहे. पण तरीही आलियाच्या कामाचे चहूबाजूंनी कौतूक होत आहे. चाहते स्तुती करत असताना वडील महेश भटने तिच्या ट्रेलरवर दिलेली कमेंट पाहून आलिया नाराज होऊ शकते. 

 

Alia is a GUNDI 👊👊👊👊 pic.twitter.com/kdfa496e4s

— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) January 10, 2019

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अशी होती महेश भट यांची रिअॅक्शन 
महेश भट यांनी आलियाचे 'गली बॉय' चित्रपटाचे व्हायरल होत असलेले एक मीम सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'आलिया गुंडी आहे.' स्वतःच्या वडिलांकडून मिळालेली ही रिअॅक्शन पाहून आलिया नाराज होऊ शकते. पण वडील महेश भट यांच्या या ट्वीटवर अजून आलियाची कोणतीही रिअॅक्शन आलेली नाही. या चित्रपटाची कथा अशा दोन लोकांची आहे, जे मुंबईच्या झुग्गी-झोपडीमध्ये त्यांचे बालपण गेले पण नंतर ते देशातील मोठे रॅपर बनले. चित्रपटात रणवीर पुर्णपणे रॅपरप्रमाणे बोलताना दिसला आहे तर आलियाच्या डायलॉग्समध्ये कॉमेडी दिसतेय. एका डायलॉगमध्ये आलिया म्हणते, ''मेरे ब्वॉयफ्रेंड से गुलू-गुलू करेंगी तो धोपतुईंगी न उसको'' आलिया भट आणि रणवीर सिंहची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटात विजय राज आणि कल्कि कोचलिनही काम करत आहेत. 14 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय. आलियाने 2012 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटातून डेब्यू केला होता. 

 


 

बातम्या आणखी आहेत...