Home | Gossip | alia bhatt now givs answer to kangna ranaut's statement about alia's acting in 'gully boy'

आलिया भट्टसोबत तुलना केल्यामुळे भडकली कंगना रनोट, आता स्वतः आलियाने दिले तिला सडेतोड उत्तर 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 03:31 PM IST

कंगना म्हणाली होती, 'मला लाज वाटते आहे की, माझी तुलना आलियासोबत केली वाजते आहे...' 

 • alia bhatt now givs answer to kangna ranaut's statement about alia's acting in 'gully boy'

  मुंबई : कंगना रनोटच्या स्टेटमेंटवर आता आलिया भट्टची प्रतिक्रिया आली आहे. तिचे म्हणणे आहे की, "मी कंगनाचा सल्ला आणि टिपूच्या कामाचे खूप कौतुक करते. जर तिला माझ्या फिल्मविषयी असे काही वाटत असेल तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल. नक्कीच कुठेतरी काही कमी पडले असेल."

  फिल्म 'राजी' साठी केले होते कौतुक...
  आलिया पुढे म्हणाली, "मला माहित आहे की, तिने 'राजी' पाहिल्यानंतर तिने माझे कौतुक केले होते. मला आता केवळ स्वतःच्या कामावरच लक्ष द्यायचे आहे. जर मी माझी येणाऱ्या फिल्ममध्ये खूप मेहनत केली तर कदाचित तिला माझे काम आवडेल आणि पुन्हा एकदा ती माझे कौतुक करेल."

  'मणिकर्णिका' आणि 'गली बॉय'मध्ये तुलना केल्यामुळे भडकली होती कंगना...
  जेव्हा एका एंटरटेंमेंट वेबसाइट द्वारा कंगना रनोटची 'मणिकर्णिका' आणि आलियाच्या 'गली बॉय' मधील परफॉर्मन्सची तुलना केली गेली तर प्रेक्षकांच्या पसंतीस कंगना उतरली. ज्यानंतर अभिनेत्री स्वतःला बोलण्यापासून रोखू शकली नाही आणि म्हणाली, "मला लाजिरवाणे वाटत आहे की...आलियाच्या 'गली बॉय' मध्ये मला हरवण्यासारखे काय होते, पुन्हा तोच बडबड्या मुलीचा रोल. बॉलिवूडमध्ये अशा दर्जाची कामे काम बंद करा."

Trending