आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियाच्या बहिणीने अनेक वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, महेश भट यांनी केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: डायरेक्टर आणि प्रोड्यूसर महेश भट आता चित्रपटांमध्ये अभियन करताना दिसणार आहे. महेश भट यांचा डेब्यू चित्रपट 'द डार्क साइड ऑफ लाइफ'चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये महेश भट म्हणाले की- आपल्या देशात मानसिक आजाराविषयी कमी जागरुकता आहे. मी माझ्या घरात माझी मुलगी शाहीनसोबत सर्व काही होताना पाहिले आहे. त्यांनी सांगितले की, "जेव्हा शाहीन 12 वर्षांची होती, तेव्हा ती क्लीनिकल डिप्रेशनमचा सामना करत होते. यावेळी तिने अनेक वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला." शाहीन ही आलिया भटची मोठी बहीण आहे. 


वाढत आहेत आत्महत्येचे प्रमाण

समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहेत. याविषयी महेश भट म्हणाले की, 'हा एक मानसिक आजाराचा प्रकार आहे. यावर उपचार केले जाऊ शकतात. तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला इंसुलिन शॉट घ्यावा लागतो. ते म्हणाले की, याच प्रकारे जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असतात, तेव्हा तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असते. ते मेडिटेशनने तुमच्यावर उपचार करतात. परंतू मला वाटते की, आपल्या देशात मानसिक आजाराविषयी कमीजागरुकता आहे. जवळपास प्रत्येक घरातील लोक डिप्रेशनचा सामना करत असतात.'

 

इन्सोम्निया डिसऑर्डरचा बळी
मोठी बहीण शाहीनच्या आजाराविषयी आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती की, शाहीन गेल्या काही काळापासून डिप्रेशनविषयी कुटूंबासोबत ओपन झाली झाली आणि यासाठी थेरेपी सेशनही अटेंड करतेय. शाहीन इन्सोम्निया डिसऑर्डरचा सामना करतेय आणि तिने अनेक रात्री या न झोपता फक्त बोलून घालवल्या आहेत.

 

या सर्वांतून बाहेर पडण्यासाठी शाहिनने खुप स्ट्रगल केला 
- याविषयी शाहीनने काही दिवसांपुर्वी एक आर्टिकल लिहून सांगितले होते की, वयाच्या 12-13 व्या वर्षी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
- शाहीनने आपल्या आर्टिकलमध्ये लिहिले होते की, मी एकापेक्षा जास्त वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मला त्रासदायक आणि अतृप्त जीवनावर विचार करण्याचा अनुभव आहे. मी स्वतःला भितीदायक विचारांमध्ये लोटले होते. माझ्याजवळ असह्य आणि अंधारमय भविष्य वाचवण्याचा हाच एक पर्याय होता. शाहीनने लिहिले होते की, माझी ओळख नेहमी आजारासंबंधीत होईल याची मला भिती वाटते. मला नेहमी निराश मुलीच्या रुपात ओळखले जाईल. 


10 जुलै रोजी रिलीज होणार महेश भट्ट यांचा चित्रपट 
महेश भट्ट यांचा डेब्यू चित्रपट 'द डार्क साइड ऑफ लाइफ: मुंबई सिटी' 10 मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा मुंबईच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात रोजगारपासून तर धर्म आणि डिप्रेशनपर्यंतचे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...