आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भटने स्विमसुटमध्ये केले अंडरवॉटर फोटोशूट, प्रत्येक फोटो बघून तुम्हीही म्हणाल 'वॉव' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  बॉलिवूडची क्युट अॅक्ट्रेस आलिया भट सध्या तिच्या आगामी फिल्म प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. फिल्म्सच्या शूटिंगसोबतच आलिया विविध फोटोशूटदेखील करत आहे. अलीकडेच तिने व्होग इंडिया या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केले आहे. व्होग इंडियासाठी आलियाने अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये आलिया अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. यात ती सीक्विन मोनोकिनी आणि स्विमसूटमध्ये दिसत आहे.

🐳

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

मोनोकिनीमध्ये आलियाचा बोल्ड लूक बघायला मिळतोय. हे फोटोशूट तिने मॅगझिनच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकासाठी केले आहे. 

आलिया पाण्याच्या आत स्ट्रेपलेस आउटफिटमध्ये सुंदर दिसतेय. तिने हातावर एक मल्टीकलर स्कार्फ बांधला आहे. 

वन-शोल्डर स्टायलिश मोनोकिनीमध्ये आलियाचा लूक बघण्यासारखा आहे. 

डीप नेक नियॉन ग्रीन गाऊनमध्ये आलियाचा ग्लॅमरस लूक बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर येतील.

🧜‍♀️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

पिंक स्विमसूटमध्ये आलियाची ही अंडरवॉटर पोज बघण्यासारखी आहे. सध्या आलिया तिचे वडील महेश भट्ट यांच्या आगामी 'सडक 2' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...