आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt Wrote An Emotional Post For Sister, Mother Said None Can Beat This Message

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आलिया भटने बहिणीसाठी लिहिली भावनिक पोस्ट, आई म्हणाली - यापेक्षा दुसरा चांगला संदेश असूच शकत नाही 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः निर्माते-दिग्दर्शक महेश भट यांची कन्या शाहिन भट हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या 31 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिची बहीण आलिया भटने बालपणीचा एक फोटो शेअर करुन त्यासोबत एक प्रेमळ संदेश लिहिला आहे. आलियान आपल्या या नोटमध्ये शाहिनसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांना उजाळा देऊन कायम सोबत राहण्यास सांगितले आहे. शाहिननेदेखील आपल्या धाकट्या बहिणीच्या या सुंदर बर्थडे विशसाठी तिला धन्यवाद दिले आहेत. इतकेच नाही तर आई सोनी राजदान यांनीही या संदेशाचे कौतुक केले आहे.

आलियाने शाहिनच्या लेखनाचे कौतुक केले आहे. ती म्हणाली की, मी वारंवार फोटोला कॅप्शन देण्याचा प्रयत्न करतेय, पण वारंवार मी ते मोडतेय. कारण मी तुझ्यासारखी चांगली लेखिका नाही. बाँडिंगविषयी ती म्हणाली, आपण ज्या भाषेचा उपयोग करतो, खरं तर त्याचा काहीच अर्थ नाही.  आई सोनी राजदानने आलियाच्या या संदेशाचे कौतुक करत यापेक्षा दुसरा चांगला संदेश असूच शकत नाही, असे म्हटले आहे. अभिनेत्री आदिती राव हैदरीनेदेखील आलिया-शाहिनच्या बालपणीच्या छायाचित्राचे कौतुक करत शाहिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नैराश्याने त्रस्त होती शाहिन...
काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत शाहिनने सांगितले होते की, ती वयाच्या 12 व्या वर्षी नैराश्याने ग्रासली होती. इतकेच नाही तर तिने वारंवार आत्महत्येचाही विचार केला होता.