आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: अखेर आलियाने व्यक्त केले रणबीरवरील प्रेम, बेस्ट अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर स्वीकारताच म्हणाली - I Love You, रणबीरचे डोळे पाणावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन शनिवारी रात्री उशीरा जियो गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले. यंदाचा बेस्ट अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड आलिया भट्ट हिला चित्रपट 'राझी' साठी मिळाला आहे. अवॉर्ड विनिंग स्पीच देत असतानाच तिने अचानक रणबीर कपूरवर आपले प्रेम व्यक्त केले. आलियाने रणबीरला 'आय लव्ह यू' म्हणताच तो इमोशनल झाला. क्षणार्धात त्याचे डोळे पाणावले. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरने 'संजू' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळवला. अवॉर्ड स्वीकारण्यापूर्वी रणबीर आणि आलियाने लिप-लॉक केले. दोघांच्या या किसच्या वेळी प्रेक्षकांना टाळ्या वाजवल्या. सोशल मीडियावर दोघांचा हा रोमॅन्टिक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बातम्या आणखी आहेत...