आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Will Appear With New Hero In Sanjay Leela Bhansali's Upcoming Film 'Gangubai'...

संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट 'गंगूबाई' मध्ये आलियासोबत दिसणार नवा हीरो...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'इंशाअल्लाह' बंद झाल्यानंतर आता संजय लीला भन्साळी, आलिया भट्टसोबत 'गंगूबाई' वर काम करत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा होती मात्र चित्रपटाशी जाेडलेल्या लोकांच्या मते, कार्तिकला यात घेतले नसून यासाठी भन्साळी एखाद्या नवीन अभिनेत्याला यात घेण्याचा विचार करत आहेत. सूत्रानुसार, भन्साळीने यासाठी बऱ्याच कलाकारांची मुलाखत घेतली आहे. यापैकी एक ईशान खट्टरदेखील आहे. मात्र अजून यावर काही निर्णय झाला नाही. या चित्रपटात दीपिका पदुकोणदेखील दिसू शकते अशी चर्चा होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीरदेखील भन्साळीसोबत चर्चा करताना दिसले होते. त्यामुळे तिघेही या चित्रपटात दिसू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.