आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alibaba चे संस्थापक सीईओ जॅक मा यांच्या निवृत्तीची घोषणा; आता Retirement नंतर मुलांना देणार वेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाइट अलीबाबाचे को-फाउंडर आणि सीईओ जॅक मा यांनी रिटायरमेंटची घोषणा केली आहे. ते सोमवारी 54 वर्षांचे होत आहेत. याच दिवशी ते कामातून निवृत्त होतील. जॅक मा 40 अब्ज अमेरिकन डॉलर (2 लाख 88 हजार कोटी रुपये) इतक्या संपत्तीसह चीनचे सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. अलीबाबाचा सीईओ होण्यापेक्षा आपल्या मुलांवर लक्ष देणे आणि त्यांचा अभ्यास करून घेणे अधिक महत्वाचे आहे. तसेच हे काम आपण आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो असे जॅक मा यांनी स्पष्ट केले. ते लवकरच पुन्हा शिक्षकाच्या रुपात दिसणार आहेत. 


अलीबाबा सुरू करण्यापूर्वी होते शिक्षक
1999 मध्ये जॅक मा यांनी अलीबाबा वेबसाइटची सुरुवात केली. त्यापूर्वी ते इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते, की ते अब्जाधीश बिल गेट्स यांच्याप्रमाणेच आपल्या नावाचे फाउंडेशन स्थापित करू इच्छित आहेत. हे फाउंडेशन पूर्णपणे शिक्षणावर केंद्रीत राहणार आहे. बिल गेट्स यांच्याकडून अजुनही खूप काही शिकायचे आहे. त्यांच्यासारखा श्रीमंत होऊ शकत नाही. पण, त्यांच्यापेक्षा आधी रिटायर होऊन त्यांच्याहून चांगला शिक्षक मी आवश्य होऊ शकतो असेही जॅक मा यांनी स्पष्ट केले. गेल्या 10 वर्षांपासून आपण निवृत्तीची तयारी करत होते असेही ते पुढे म्हणाले. 


टीमवर पूर्ण विश्वास
एक्सपर्ट्सनुसार, जॅक मा यांनी कंपनी सोडली तरीही ती पार्टनरशिप स्ट्रक्चर मार्फत नियंत्रित राहील. जॅक मा यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना अलीबाबाच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. हा स्ट्रक्चर त्यांनीच तयार केला आहे. काही गुंतवणूकदारांना तो आवडला नाही. तरीही कंपनीत आपले मोठे योगदान असल्याने तेच कंपनीला खूप पुढे नेईल. जॅक मा यांच्याकडे अलीबाबा व्यतिरिक्त अॅन्ट फायानांशियलचे देखील नियंत्रण आहे. ही चीनची सर्वात मोठी मोबाईल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. चीनचे 87 कोटी लोक या कंपनीशी जोडलेले आहेत. 


विद्यापीठात दोनदा नापास झाले होते जॅक मा
जॅक मा एक आदर्श शिक्षक आणि उद्योजक असले तरीही ते विद्यापीठातील परीक्षेत दोनदा नापास झाले होते. चीनच्या विद्यापीठात नापास झाल्याची कबुली देताना जॅक मा यांनी आपण एक चांगला विद्यार्थी नव्हतो. परंतु, आपल्या अभ्यासात सातत्याने सुधारणा केली असे ते म्हणाले होते. माणूस नेहमीच शिकत राहतो. त्यामुळे, आपला वेळ शिकण्यात आणि शिकवण्यातच देणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...