आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील सर्वात जुनी व माेठी इंटरनेट कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांची 55 व्या वर्षी निवृत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा आपल्या ५५ व्या वाढदिवसाच्या दिवशी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कंपनीची सूत्रे डॅनियल झांग यांच्याकडे साेपवली आहेत. आता ते शिक्षण आणि समाजसेवेवर अधिक लक्ष केंद्रित करतील, अशी अपेक्षा आहे. जॅक मा एकेकाळी शिक्षक हाेते. त्यामुळे त्यांना शिक्षणाची जास्त गाेडी आहे. एक सामान्य शिक्षकापासून ते अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे करण्याचा प्रवास जॅक यांनी पूर्ण केला आहे. त्यांची मालमत्ता ४ हजार काेटी डाॅलर (अंदाजे २.८ लाख काेटी रु.) आहे. जॅक मा यांना काॅम्प्युटर सायन्सची माहिती नव्हती. ना त्यांंना फायनान्सबद्दल माहिती हाेते. तरीही त्यांनी अलिबाबा समूहाची उभारणी केली. सद्यस्थितीत हा समूह ३३ लाख काेटी रुपयांचा आहे.जॅक मा यांच्या अलिबाबामध्ये पहिली माेठी गुंतवणूक साॅफ्टबँक या फायनान्स कंपनीने केली आहे. अलिबाबाचे सुरुवातीचे गुंतवणूकदार यू यिंग म्हणाले,जॅक यांच्या २ मिनिटांच्या विश्वासातून २ कोटी डॉलरची गुंतवणूक केली. प्रवास १९९४ मध्ये प्रथम इंटरनेटचे नाव ऐकले, अमेरिकेतील प्रवासादरम्यान वेबसाइटची निर्मिती वयाच्या ३३ व्या वर्षी खरेदी केला पहिला संगणक - जॅक मा यांंनी १९९४ मध्ये ३० व्या वर्षी इंटरनेटचे नाव पहिल्यांदा ऐकले. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी पहिली कंपनी स्थापन केली. - १९९५ मध्येच ते प्रथम अमेरिकेला गेले. तिथे पहिली वेबसाइट तयार केली. या वेबसाइटने ३ वर्षांत ५.६ रुपयांची कमाई केली. - १९९७ मध्ये जॅक मा यांनी पहिले संगणक खरेदी केले. ४ एप्रिल १९९९ ला हांगझोऊमध्ये अलिबाबाची स्थापना केली. - २००९ मध्ये टाइम मासिकाने सर्वाधिक प्रभावशाली १०० लोकांच्या यादीत जॅक मा यांच्या नावाचा समावेश केला. - १९ सप्टेंबर २०१४ ला कंपनीची न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदणी झाली. त्यांनी तेव्हा सर्वात मोठा २५०० कोटी डॉलरचा आयपीओ आणला. इंग्रजी सुधारण्यासाठी गाइडचे काम, हाॅवर्डने १० वेळा अर्ज फेटाळला उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी जॅक मा यांनी जाेरदार प्रयत्न केले, परंतु अपयशी ठरले. चीनमध्ये सतत चार वर्षे ते काॅलेज प्रवेश परीक्षेत नापास झाले. त्यानंतर अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या हाॅवर्ड विद्यापीठात प्रवेशासाठी त्यांनी १० वेळा अर्ज केला. प्रत्येक वेळेला त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. चीनमध्ये सलग४ वर्षे ते कॉलेज प्रवेश परिक्षेत नापास होत. नोकरीसाठी ३० संस्थांमध्ये अर्ज, केएफसीची नोकरीही मिळाली नाही जॅक मा यांनी आपला जीवनस्तर उंचावण्यासाठी कित्येक ठिकाणी नोकरीचा शोध घेतला, परंतु निराशाच हाती लागली. त्यांनी ३० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले, सर्वांनीच त्यांना नकार दिला. त्यांच्या शहरात केएफसीची शाखा सुरू झाली तेव्हा २४ जणांनी नोकरासाठी मुलाखत दिली. जॅक मा वगळता उर्वरित २३ जणांची निवड झाली. यानंतर त्यांची इंटरनेटची ओळख झाली आणि यानंतर जास्त माहिती घेण्यासाठी अमेरिकेला गेले. चीनमध्ये अलिबाबासमोर अॅमेझॉन देखील टिकाव धरू शकले नाही जेफ बेजोस यांनी १९९४ मध्ये अॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी सुरू केली. अॅमेझॉनने आपला व्यवसाय चीनमध्येही विस्तारित केला. परंतु, चीनमध्ये जॅक मा यांच्या अलिबाबाचा असा दबदबा निर्माण झाला होता की त्यासमोर अॅमेझॉनचा टिकाव लागला नाही. अॅमेझॉनने चीनमधून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. अलिबाबा ग्रुप जगातील २४० देशांत ई-कॉमर्स सेवा देतो. अलिबाबा.काॅमद्वारे ई-कॉमर्स व्यवसाय सुरू, त्यानंतर अन्य क्षेत्रात अलिबाबा.काॅम, १६८८.काॅम, अलिएक्सप्रेस.काॅम, यूसी ब्राउझर, अलिपे, अलिबाबा क्लाउड, अलिबाबा पिक्चर्स, यूसी न्यूज या शिवाय चीन तसेच विदेशातील अनेक कंपन्यांनी अलिबाबा समुहामध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारतात पेटीएम, स्नॅपडिल, बिग बास्केट, झाेमॅटो सारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. जॅक मा यांची जगभरातील गुुंतवणूक - चीनी करमणूक उद्योगात हुएई ब्रदर्स व एनलाइट मीडियात गुंतवणूक. - ऑनलाइन स्पोर्ट््स रिटेलर फॅनेटिक्समध्ये गुंतवणूक. - अमेरिकेत ऑनलाइन शॉपिंग सर्व्हिस शॉपनर - मोबा. मेसेजिंग अॅप टॅगो - राइड शेअरिंग लिफ्ट - कामाच्या आधारावर अॅप शोधणारे सर्च इंजिन क्विकसी - मोबाइल गेम स्टुडिओ कबाम - सोशल मीडिया कंपनी स्नॅपचॅट - व्हॅर्च्युअल रियल्टी अॅप मॅजिक लिप

बातम्या आणखी आहेत...