आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदीत अलिबाबाच्या शेअर्सची हाँगकाँग बाजारात 6% झेप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा मंगळवारी हाँगकाँगच्या शेअर बाजारात लिस्ट झाली. या वर्षीचा जगातील सर्वात मोठा आयपीओ आणत हाँगकाँग शेअर बाजारात अलीबाबाने पहिल्याच दिवशी ६.६ टक्के वाढ नोंदली. इश्यू किंमत १७६ हाँगकाँग डॉलर(सुमारे २२.५ डॉलर)च्या तुलनेत कंपनीचा समभाग वधारून १८७.६० हाँगकाँग डॉलरवर बंद झाला. हाँगकाँगमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून लोकशाही समर्थकांचे सरकारविरोधी आंदोलन सुरू आहे. हाँगकाँगने मंदीची घोषणा केली आहे. अशा स्थितीत हाँगकाँगमध्ये अलीबाबाचे आयपीओ पूणपणे सब्स्क्राइब होणे आणि लिस्टिंगच्याच दिवशी समभागांत उसळी खूप सकारात्मक आहे. ही कंपनी आणि बाजारपेठ दोन्हींसाठी चांगली बातमी आहे. अलीबाबा याआधीच न्यूयॉर्क शेअर बाजारात या वर्षी पाचवी मोस्ट ट्रेडेट कंपनी आहे. अलीबाबाने हाँगकाँग शेअर बाजारात आपल्या आयपीओतून ८० हजार कोटी रुपये जमा केले आहेत. शेअरच्या ओव्हर अलॉटमेंटचा पर्याय निवडत असेल म्हणजे, आणखी शेअर जारी करत असेल तर आयपीओचे मूल्य वाढून सुमारे ९३ हजार कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल. हे या वर्षीचा आतापर्यंत सर्वात मोठा आयपीओ आहे. अलीबाबाने २०१४ मध्येच हाँगकाँग शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी अर्ज केला होता.