आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alipur District Court Stays Arrest Warrant Against Mohammed Shami In Domestic Violence Case

मोहंमद शमीला न्यायालयाकडून दिलासा, अटकेवर स्थगिती; पत्नीने लावले घरगुती हिंसाचाराचे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - भारताचा स्टार क्रिकेटर मोहंमद शमीला न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला. घरगुती हिंसाचार प्रकरणी स्थानिक कोर्टाने शमीच्या अटकेवर स्थगिती आणली आहे. पत्नी हसीन जहां हिने शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी हसीन जहां आणि मोहंमद शमी यांच्यात वाद सुरू आहेत. यापूर्वी हसीन जहांने शमीवर विवाहबाह्य संबंधांसह चक्क मॅच फिक्सिंगचे देखील आरोप केले होते. त्या प्रकरणात शमीला आधीच क्लीनचिट मिळाली. हसीन जहांच्या नवीन आरोपांवर 2 सप्टेंबर रोजी कनिष्ठ न्यायालयाने शमीला 15 दिवसांत सरेंडर होऊन जामीन अर्ज करण्यास सांगितले होते. याच निर्णयास शमीने आव्हान दिले होते.

12 सप्टेंबर रोजी भारतात परतणार शमी
शमीचे वकील सलीम रेहमान यांनी सोमवारी सांगितले, की अलीपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राय चट्टोपध्याय यांनी शमीच्या अटकेवर स्थगिती आणली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. शमीच्या विरोधात अटकेचे आदेश काढण्यात आले त्यावेळी तो भारतात नव्हता. तो टीम इंडियासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर होता. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) चे अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. बीसीसीआयने सांगितल्याप्रमाणे, शमी 12 सप्टेंबर रोजी भारतात परतणार आहे. तो आपल्या वकिलांच्या संपर्कात आहे. वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला गेला होता. त्याच ठिकाणावरून त्याने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तेथून थेट तो भारतात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...