आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''या हैवानाने तर आपल्या माणसांनाही सोडले नाही, अनेकींची आपल्या घरातच केली शिकार'', अनु मलिकवर भडकली मेड इन इंडियाची सिंगर अलिशा चिनॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मेड इन इंडिया' सारखे गाणे गाऊन प्रसिद्ध झालेली सिंगर अलिशा चिनॉयही अनू मलिकच्या कृत्यांची शिकार ठरली होती. अलिशाने मीटू कॅम्पेनअंतर्गत अनु मलिकवर लावण्यात आलेले सर्व आरोप योग्य असल्याचे सांगत म्हटले की, मी पीडितांसोबत आहे. वास्तविक, भारतात MeToo कॅम्पेनची सुरुवात तनुश्री दत्ताने नाही, तर 90च्या दशकता अलिशा चिनॉयनेच केली होती.

 

नुकतीच अनु मलिकला म्हणाली हैवान
अलिशाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, "त्या मुलींनी अनु मलिकबद्दल जे काही म्हटले आहे, त्यातला शब्द न् शब्द खरा आहे. मी त्यांच्यासोबत आहे. या हैवानाने तर आपल्या माणसांनाही सोडले नाही. ज्या श्वेता पंडितसोबत त्याने हे कृत्य केले ती म्युझिक डायरेक्टर जतिन-ललितची पुतणी आहे. मलिकला दोन मुली आहेत आणि इतकी वर्षे होऊनही तो आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणींवर वाईट नजर ठेवतो. अनेकींची तर त्याने आपल्या घरातच शिकार केली."

 

अलिशाने मागितली होती भरपाई
1995 च्या दरम्यान अलिशा चिनॉयचा अल्बम मेड इन इंडिया रिलीज झाला होता. तेव्हा अलिशाने अनुवर सेक्सुअल हरॅसमेंटचे आरोप केले होते. अनुवर एक केसही दाखल केली होती. त्याबद्दल्यात अलिशाने त्याला 26.60 लाख रुपयांची भरपाई मागितली होती. यानंतर अनुने आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत उलट अलीशावरच 2 कोटी रुपयांच्या मानहानीची केस दाखल केली होती.

 

सोबत काम न करण्याची घेतली शपथ
अलिशाने हे प्रकरण मिटवण्यासाठी समझौत्याचा मार्ग निवडला. परंतु आयुष्यभर अनु मलिकसोबत काम न करण्याची शपथ घेतली. तथापि, काही वर्षांनंतरच 2002 मध्ये दोघांनी शाहिद कपूरचा चित्रपट 'इश्क-विश्क'साठी एकत्र काम करून सर्वांनाच चकित केले होते. अलिशाचे शेवटचे गाणे 2013 मध्ये आलेल्या 'क्रिश-3'मध्ये आले होते.

 

बातम्या आणखी आहेत...