आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींचा भारतरत्न परत घेण्याच्या ठरावावरून दिल्लीत गोंधळ, कुणाचाही राजीनामा घेतला नाही -आप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना दिलेला मरणोपरांत भारतरत्न परत घेण्याच्या ठरावावरून दिल्ली विधानसभेत गोंधळ निर्माण झाले. आपच्या अल्का लांबा यांनी यासंदर्भातील एक ठराव सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यावरून आम आदमी पक्षाने त्यांना पक्ष सोडण्याचे आदेश दिले आहेत अशा चर्चा होत्या. सोबतच, सोमनाथ भारती यांना देखील आपच्या प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले असे सांगण्यात आले. परंतु, आता दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या सर्वच अफवा होत्या असे म्हटले आहे. दिल्ली विधानसभेत 1984 च्या शिखविरोधी दंगलींना नरसंहार संबोधणारा ठराव मांडण्यात आला.

 

कुणाचाही राजीनामा घेतला नाही -उपमुख्यमंत्री

विधानसभेत सादर करण्यात आलेल्या मूळ ठरावात राजीव गांधी यांचे भारत रत्न परत घेण्याची मागणी करणारा कुठलाही प्रस्ताव नव्हता. तो हाताने जोडण्यात आला आहे असे आपने स्पष्ट केले आहे. सोबतच या प्रकरणात आम आदमी पक्षाने कुणाचाही राजीनामा घेतला नाही असे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे.

 

अशा प्रकारचा ठराव मंजूर झालाच नाही -आप
दिल्ली विधानसभेत शिख विरोधी दंगलीचा निषेध करताना कथितरित्या राजीव गांधी यांच्या विरोधात ठराव जरनैल सिंह यांनी ठेवला होता. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांच्यासह सभागृहात उपस्थित सर्वच सदस्यांनी एकमताने समर्थन देऊन मंजूर केले. परंतु, आपचे आमदार आणि प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी राजीव गांधींबाबतचा उल्लेख मूळ ठरावात नव्हता. तो नंतर हाताने लिहून ठरावात पुरवणी म्हणून जोडण्यात आला होता. अशा प्रकारचा ठराव वैयक्तिक असून त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर राजीव गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात आले. 1991 मध्ये त्यांना मरणोपरांत सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला होता.

 

ठरावात नेमके काय?
- दिल्ली विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात शिखविरोधी दंगलींचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला. दिल्ली सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला कठोर शब्दात पत्र पाठवून राजधानीत झालेला नरसंहारानंतर त्याचे पीडित आणि नातेवाइक अजुनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असे म्हणायलाच हवे.
- देशातील कायद्यात नरसंहार आणि मानवताविरोधी कृत्यांना सामिल करण्यासाठी महत्वाची पावले उचलावीत असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केंद्राला पत्र लिहून आवाहन करावे. दिल्ली हायकोर्टाने शिख दंगल प्रकरणी सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा दिली. त्या निकालाचे ठरावात स्वागत करण्यात आले आहे.

 

काँग्रेस म्हणे...
दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन म्हणाले, की "राजीव गांधींनी देशासाठी आपला जीव दिला. आम आदमी पक्षाचा खरा चेहरा आता समोर आला आहे. मी नेहमीच म्हणत होतो, की आप ही भाजपची टीम बी आहे. आपने गोवा, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये आपले उमेदवार उतरवले. त्याचा फायदा भाजपलाच झाला काँग्रेसच्या मतांचा आकडा कमी झाला.''

बातम्या आणखी आहेत...