Home | Sports | Other Sports | all england badminton championship 2019 k shrikant

ऑल इंग्लंड बॅडमिंटन : 18 वर्षांनंतर किताबाचे भारताचे स्वप्न भंगले

वृत्तसंस्था | Update - Mar 10, 2019, 10:55 AM IST

सिंधू, सायनापाठाेपाठ आता शनिवारी सातव्या मानांकित के. श्रीकांतला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले.

  • all england badminton championship 2019 k shrikant

    बर्मिंगहॅम - प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षांनंतर किताब जिंकण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न भंगले. यासाठी प्रतिभावंत आणि अनुभवी खेळाडूंनी घेतलेली मेहनत अपयशी ठरली. यातूनच अवघ्या ४४ मिनिटांत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.


    सिंधू, सायनापाठाेपाठ आता शनिवारी सातव्या मानांकित के. श्रीकांतला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्याला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले आहे. जपानच्या नंबर वन माेमाेताने सरस खेळीच्या बळावर भारताच्या श्रीकांतला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने ४४ मिनिटांत २१-१२, २१-१६ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह जपानच्या खेळाडूने पुरुष गटाची उपांत्य फेरी गाठली. यादरम्यानची श्रीकांतची झंंुज अपयशी ठरली.


    माेमाेताचा श्रीकांतवर सलग आठवा विजय :
    नंबर वन खेळाडू माेमाेताने श्रीकांतविरुद्धची विजयी लय कायम ठेवली. यासह त्याने आता सलग आठव्या विजयाची नाेंद केली. आतापर्यंत हे दाेन्ही खेळाडू १४ वेळा सामन्यात समाेरासमाेर आले.

Trending