आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत फडवणीस सरकारच्या हालचाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : लोकसभा निवडणुका पार पडल्या असून निकालाअगोदरच भाजप-सेना सरकारने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेचे लक्ष समोर ठेवून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याअगोदर 2017 मध्ये देवेंद्र सरकारने कर्जमाफी केली होती. त्यानंतर आता परत एकदा विधानसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मोठा डाव खेळण्याची तयारी सरकारने केली आहे. 


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपतर्फे मुंबईत दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मार्च 2016 ते 2018 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या विकासकामांची ब्लू प्रिंट जनतेसमोर मांडणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.