आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All Four Accused Of Nirbhaya Will Hanged At The Same Time; High Court Directives

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षयचा दयेचा अर्ज फेटाळला; निर्भयाच्या चारही दोषींना एकाच वेळी फाशी, हायकोर्टाचे निर्देश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निर्भयाच्या चारही दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, सर्वांना एकाच वेळी फासावर लटकावले जाईल, असे दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले. दोषींच्या डेथ वॉरंटवर स्थगितीशी संबंधित सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केंद्र सरकारची याचिकाही हायकोर्टाने फेटाळली. यानंतर काही तासांतच केंद्र व दिल्ली सरकारने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. चारही आरोपींनी ७ दिवसांत आपले सर्व कायदेशीर पर्याय वापरून संपवावेत, असे निर्देश न्या. सुरेशकुमार कैत यांनी दिले. यानंतर डेथ वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मुकेश सर्व पर्याय वापरून पाहत आहे म्हणून त्याला इतरांच्या आधी फाशी देता येणार नाही, असेही न्या. कैत म्हणाले.

अक्षयचा दयेचा अर्ज फेटाळला :


राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी बुधवारी दाेषी अक्षयचा दयेचा अर्ज फेटाळला. यापूर्वी मुकेश व विनय यांचेही अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आता फक्त पवन गुप्ताजवळच क्युरेटिव्ह याचिका व दयेच्या अर्जाचा पर्याय उरला आहे.