आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All Is Not Well Between Salman Khan And Colors Channel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss 12: दीपिकाला नव्हे या स्पर्धकाला विजेता होताना बघू इच्छित होता सलमान, ऐकले नाही म्हणून चॅनलपासून फारकत घेण्याचा निर्णय? आणखी एका गोष्टीमुळेही नाराज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 2016 मध्ये जेव्हा सलमान खानने कलर्स वाहिनीसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा वाहिनीने सलमानचा सल्ला आणि मागण्या मान्य केल्या होत्या. पण आता सर्व गोष्टी बदलल्या आहेत. सलमान आता या वाहिनीसोबत भविष्यात काम करणार नाहीये. याचे कारण म्हणजे  'बिग बॉस 12'ची विजेती दीपिका कक्कर आणि शोचा घसरता टीआरपी.

 

दीपिका विजेती ठरल्याने नाखुश आहे सलमान... 

- सुत्रांच्या माहितीनुसार, ' सलमान दीपिका जिंकल्याने खूश नाहिये. त्याच्या मते श्रीसंथ जिंकायला हवा होता. श्रीसंथच बिग बॉसचा योग्य विजेता होता. तो या शोमध्ये स्वतःची प्रतीमा सुधारण्यासाठी आला होता. तो शोमध्ये एक अजेंडा घेऊन आला होता, जो शोच्या शेवटी पूर्णही झाला होता. त्याने केवळ स्वतःची इमेज बदलली नाही तर त्याला प्रेक्षकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही मिळाला होता. पण चॅनलने दीपिकाला विजेता म्हणून घोषित केले. कारण ती चॅनलची ब्रॅण्ड आहे. फिनाले सुरु असताना चॅनल आणि सलमान खान यांच्यात यावरुन वाद झाल्याचेही वृत्त आहे."

 

सलमान यामुळेही झाला नाराज 
- सलमान शोच्या घसरत्या टीआरपीमुळे खूश नव्हता.   शिफारशीवरुन झालेल्या स्पर्धकांच्या निवडीमुळेही तो नाराज होता. शोने जणू चार्म गमावला आहे, असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो शो होस्ट करु इच्छित नव्हता. कथितरित्या चॅनल आणि  'बिग बॉस'च्या मेकर्समधील करार संपुष्टात आला असून प्रॉडक्शन हाऊस तो रिन्यू करण्याच्या विचारात नाहीये. येणा-या काळात हा शो दुस-या वाहिनीवर प्रसारित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बातम्यांनुसार, सलमान फक्त या शोसोबतच नव्हे तर चॅनलसोबतही भविष्यात काम न करण्याच्या विचारात आहे. सलमान बिग बॉसच्या चौथ्या पर्वापासून हा शो होस्ट करत असून यापूर्वीही तो शो होस्ट करणार नसल्याचे वृत्त अनेकदा आले होते. आता बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये सलमान खरंच शो होस्ट करणार की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल.