'कामसूत्र'मधील या गोष्टी आहेत कामाच्या, संभोगसुखाचा मिळवाल पूर्ण आनंद
यामध्ये केवळ सेक्स संबंधांविषयी सांगण्यात आले नसून, याउलट यामध्ये दाम्पत्य जीवनातील सर्व गोष्टींची माहिती आहे.
-
कामसूत्रचे नाव निघताच लोकांचा डोक्यात पहिला शब्द येतो सेक्स. परंतु, या महान ग्रंथाकडे केवळ सेक्सच्या दृष्टीकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही. यामध्ये केवळ सेक्स संबंधांविषयी सांगण्यात आले नसून, याउलट यामध्ये दाम्पत्य जीवनातील सर्व गोष्टींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
महर्षी वात्सायन यांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये काम आणि सूत्र या शब्दांचा उल्लेख करण्यात आला असून यामध्ये 'काम'चा अर्थ आहे इच्छा आणि इच्छा कोणत्याही प्रकारची असू शकते, विशेषतः सेक्शुअल इच्छा. 'सूत्र' चा अर्थ जीवनातील सर्व पैलू एका सूत्रामध्ये बसवून पूर्ण करणे.
हा ग्रंथ केवळ काम विषयाची माहिती देत नाही तर प्रेमाची प्रवृत्ती, कुटुंबाची भूमिका आणि जीवनाचे महत्त्व इ. विषयांवरही अमुल्य ज्ञान देतो. जीवनात आनंद कसा प्राप्त करावा, सेस्क लाईफ सुखद कशी ठेवावी इ. गोष्टींवर कामसूत्रमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. कामसूत्रच्या सात भागांमध्ये सर्व विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कामसूत्रच्या 7 भागांमध्ये कोणकोणत्या विषयांसंबंधी माहिती देण्यात आली आहे...
-
भाग 1
पहिल्या भागात, जीवनाचे लक्ष्य या विषयी सांगण्यात आले आहे. यामध्ये जीवनातील प्राथमिकता आणि ज्ञान संबंधित सांगण्यात आले आहे. सुखी-संपन्न कसे व्हावे यासोबतच तुम्ही प्रेमाच्या जगात कसा प्रवेश करावा इ. गोष्टींची माहिती या भागात देण्यात आली आहे.
-
भाग 2
या भागामध्ये मनुष्याच्या इच्छांचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये संभोगाचे आयाम उदा. आलिंगन, चुंबन, नखांचा वापर, दातांचा वापर, संभोग काळ, ओरल सेक्स, इंटरकोर्स, विपरीत लिंग इ. गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. या इच्छा 64 पोझिशनद्वारे कशा पूर्ण केल्या जाऊ शकतात. ही सर्व माहिती या भागामध्ये वर्णीत आहे, ज्यामुळे कामसूत्र ग्रंथ एवढा प्रसिद्ध झाला.
-
भाग 3
किती प्रकारचे असतात विवाह, चांगली मुलगी कशी प्राप्त करावी, मुलगी आरामदायक स्थितीमध्ये केव्हा असते, एकटे कसे राहावे, लग्न कशाप्रकारे दोन लोकांचे मिलन आहे. या विषयांवर या भागात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
-
भाग 4
एका पत्नीचे आचरण कसे असावे. जर एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर मुख्य पत्नीचे आणि इतर पत्नीचे आचरण कसे असावे या विषयावर सविस्तर माहिती या भागात देण्यात आली आहे.
-
भाग 5
या भागामध्ये पुरुष आणि महिलेने एकमेकांशी कसे वागावे याविषयी सांगितले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, स्त्री-पुरुषांनी एकमेकांना कसे समजून घ्यावे, एकमेकांच्या भावनांचे कसे मुल्यांकन करावे तसेच महिलांशी संबंधित इतर काही खास गोष्टी या भागात सांगण्यात आल्या आहेत.
-
भाग 6
या भागामध्ये महिलांविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी सांगण्यात आले आहे की, प्रियकराची निवड करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. चांगला प्रेमी कसा निवडावा. पूर्व प्रीयाकारापासून दूर राहण्याचे उपाय, मित्रत्व टिकवून ठेवणे इ. विषयांवर सविस्तर चर्चा या भागामध्ये करण्यात आली आहे.
-
भाग 7
शारीरिक आकर्षण कसे वाढवावे, सेक्शुअल क्षमतेची कमतरता दूर करण्याचे उपाय. या सर्व विषयांची सविस्तर माहिती कामसूत्रच्या शेवटच्या भागात सांगण्यात आली आहे. कामसूत्र या सात भागांमध्ये लिहिण्यात आले आहे. हे भाग वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, यामध्ये केवळ सेक्सची माहिती नाही तर सुखी आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या इतरही विषयांची माहिती आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, जोडीदारासोबत कामसूत्र विषयावर कशाप्रकारे करावी चर्चा...
-
कामसूत्र या विषयावर चर्चा करण्यासाठी पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी एकमेकांना घाबरतात, त्यांना वाटते की हा विषय काढल्यानंतर तो किंवा ती आपल्याबद्दल कसा विचार करेल. यामागचे मुख्य कारण म्हणजे कामसूत्रबद्दल लोकांमध्ये असलेलेला गैरसमज. जेव्हापासून या ग्रंथाची रचना झाली आहे, तेव्हापासून लोक याला केवळ एक यौन शास्त्र मानतात.
-
विश्वास संपादन करा
विश्वास कोणत्याही नात्याचा पाया असतो. जर तुम्ही सोबत असाल तर तुमचा एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला एकमेकांवर विश्वास नसेल तर याचा वाईट प्रभाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक संबंधांवरही पडेल. यामुळे नात्यामध्ये विश्वास संपादन करण्याचा दोघांनीही प्रामाणिक प्रयत्न करा.
-
बेडवर करू नका चर्चा
संभोग क्रीयेपुर्वी, नंतर किंवा यादरम्यान या मुद्यावर चर्चा करण्यापासून दूर राहा. एखादी उपयुक्त वेळ निश्चित करा. या चर्चेसाठी तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाची निवड करू शकता.
-
कामसूत्रवर चर्चा करा
कामसूत्रमधील कोणत्याही आसनाचे अनुकरण करण्यापूर्वी आपल्या जोडीदारासोबत या विषयावर मोकळ्या मनाने गप्पा मारा. कामसूत्र पुस्तकाचा पूर्ण अभ्यास करा. जर तुम्हाला कामसूत्रचा संपूर्ण आनंद घेण्याची इच्छा असेल तर ते समजून घेऊन वाचा यामुळे त्यामधील आसनाचे योग्य ज्ञान मिळू शकेल. शक्य असल्यास पुस्तक जोडीदारासोबत वाचा आणि प्रत्येक विषयवार चर्चा करा. अशाप्रकारे तुमच्या दोघांमधील सामंजस्याची स्थिती कायम राहील.
-
सहयोगाची भावना ठेवा
कामसूत्र तुमच्या आयुष्याला सुखी बनवणारा ग्रंथ आहे. याचा उद्येश्य मनुष्याच्या जीवन आणि संबंधामध्ये मधुरता आणण्याचा आहे. यामुळे यामध्ये सांगण्यात आलेल्या प्रत्येक क्रियेमध्ये दोघांचेही सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.
-
कामसूत्रचे सत्य सांगा
ज्यांनी कामसूत्र किंवा कामशास्त्र वाचलेले नाही, त्यांच्यासाठी हे केवळ एक संभोग पुस्तक आहे. परंतु कामसूत्र केवळ एक सेक्स पुस्तक नसून यामध्ये सेक्सव्यतिरिक्त व्यक्तीची जीवनशैली, पत्नीचे कर्तव्य, गृहकला, नाट्यकला, सौंदर्यशास्त्र, चित्रकला आणि वेश्यांची जीवनशैली इ. विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. कामसूत्रानुसार प्रेमाची सुरुवातच शरीरापासून होते. दोन आत्मा एकमेकांकडे बघू शकतील असा कोणताही उपाय नाही. कामसूत्र यासाठी लिहिण्यात आले आहे की, लोकांमध्ये सेक्सबद्दल जे गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर व्हावेत आणि आपले आयुष्य सुखी बनवावे.