आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिदिनी मुंबईत निघणार ईव्हीएमविरोधी सर्वपक्षीय मोर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  -  ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे मुंबईत ईव्हीएमविरोधी मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. थाेरात म्हणाले, राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या सभांना जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद होता. गावागावात लोक टीव्हीसमोर बसून राज यांच्या सभा पाहत होते. मात्र या सर्व लोकांची मते कुठे गेली, हे त्यांना आणि आम्हालाही समजले नाही. मी १९६२ पासून निवडणुका पाहत आहे. स्वत: ७ विधानसभा लढवल्या अन् जिंकल्या आहेत. मात्र, यावेळची लोकसभा निवडणूक जितकी संशयास्पद झाली, तशी निवडणूक आपण कधीही पाहिली नाही, असा दावा थोरात यांनी केला. तसेच यापुढच्या सर्व निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील ईव्हीएम संदर्भातले संभ्रमाचे वातावरण दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत मनसेने आपला निर्णय अजून जाहीर केला नाही.

बातम्या आणखी आहेत...