आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजप-सेनेच्या प्रचाराचा ‘बार’, आघाडीही तयारीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव 

मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकीत अायाराम-गयारामांच्या उड्यांनंतर उमेदवारांची निश्चिती झाली अन‌् अाता प्रचाराला वेग येत अाहे. ८ अाॅक्टाेबर राेजी विजयादशमीचा मुहूर्त साधत भाजप-शिवसेना अापला पारंपरिक दसरा मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फाेडणार अाहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मंगळवारी जाहीर सभा हाेत अाहे. तर, दुसरीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र अादित्य ठाकरे दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करतील. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभर प्रचार सभांचा धडाका सुरू केला अाहे, तर काँग्रेस नेते व उमेदवारांना मात्र पक्षाच्या हंगामी अध्यक्षा साेनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या दाैऱ्याची प्रतीक्षा अाहे.

भाजप : माेदी, शहा, गडकरींसह ४० स्टार प्रचारक, खडसेंची वर्णी
पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे ४० स्टार प्रचारक अाहेत. यूपीचे मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील, पूनम महाजन व उमेदवारी नाकारण्यात अालेले एकनाथ खडसे हेही भाजपचे स्टार प्रचारक अाहेत. विशेष म्हणजे लाेकसभेत विजयी झालेल्या चित्रपट तारे-तारकांपैकी एकाचाही समावेश नाही.  
 

काँग्रेस : गांधी परिवार, शत्रुघ्न सिन्हा व तीन मुख्यमंत्री प्रचारात
काँग्रेसच्या अध्यक्षा साेनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डाॅ. मनमाेहन सिंहसह काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक अाहेत. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा व अभिनेत्री नगमाही प्रचाराला येतील. मूळ उत्तरेकडील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांचे तीन मुख्यमंत्री अशोक गहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश) व भूपेश बघेल (छत्तीसगड) यांनाही पाचारण केले अाहे. सोबतच मलिकार्जुन खरगे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदीही प्रचारासाठी येतील.
 

राष्ट्रवादी : पवारासह काेल्हे यांना मागणी
शरद पवार हेच राष्ट्रवादीसाठी एकमेव स्टार प्रचारक ठरत अाहेत. खासदार अमाेल काेल्हेंच्या सभांनाही पक्षाच्या उमेदवारांकडून मागणी अाहे. यासोबतच माजी केंद्रीय मंंत्री प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, फौजिया खान व शशिकांत शिंदे यांचाही स्टार प्रचारकांत समावेश अाहे.
 

भाजप
अमित शहा बीड जिल्ह्यातून करणार प्रचाराचा शुभारंभ
शिवसेना
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या सभांना माेठी मागणी 
काँग्रेस
गांधी कुटुंबीयांकडून पक्षाच्या उमेदवारांना मोठी अाशा
राष्ट्रवादी
पवारच सांभाळणार धुरा, काेल्हेंचीही वाढती लाेकप्रियता

बातम्या आणखी आहेत...