आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All party Leaders Insist On Helping The Farmers ; Farmers Angry On Insurance Company

बळीराजाच्या मदतीसाठी सर्वपक्षीय नेते आग्रही; विमा कंपनीवर शेतकऱ्यांचा राेष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोल्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच काेंडले - Divya Marathi
अकोल्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच काेंडले
  • नौटंकी करणाऱ्या राजकारण्यांना महाराष्ट्राची वस्तुस्थिती समजली
  • शेतकऱ्यांना धीर : शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे दौरे; फडणवीस राज्यपालांच्या भेटीला

​​​​​​नागपूर/सांगली/ मुंबई/ सातारा : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरू असताना सर्व प्रमुख राजकीय नेतेमंडळी मुंबईत बैठकांत खलबते करण्यात व्यग्र होती. मात्र, अजूनही सत्तास्थापनेला मुहूर्त सापडत नसल्याने प्रमुख पक्षांचे नेते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बांधावर पाेहाेचले अाहेत. गुुरुवारी व शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नागपुरात, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगली, सातारा जिल्ह्यात जाऊन नुकसानीची पाहणी केली. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी केली.


नागपुरात शरद पवार म्हणाले, विदर्भासह राज्यात प्रचंड पीकहानी झाली आहे. कापूस, सोयाबीन, धान, संत्रा पिकांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकारने ३३ टक्के नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु झालेले नुकसान पाहता सरसकट पंचनामे हवेत, असे पवार म्हणाले. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी संयुक्तरीत्या राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने पुढाकार घेण्याची मागणी करणार अाहेत.

लेखी आश्वासनानंतर साडेसहा तासांनंतर सुटका
अकोला : फळपीक विम्याच्या दाव्याची रक्कम न मिळाल्याने संतापलेल्या जवळपास ३५ शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडले. हा प्रकार शुक्रवारी न्यू इंडिया इन्शुरन्स कार्यालयात घडला. अकोट तालुक्यातील पणज, रुईखेड व बोचरा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला. जवळपास साडेसहा तास चाललेल्या अांदाेलनात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अद्दल घडली. अखेर कंपनीकडून एका आठवड्यात दावे अदा करण्याचे लेखी अाश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी रात्री ८ वाजता अांदाेलन मागे घेतले. त्यानंतर अधिकारी-कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर पडले.

नुकसान भरपाईचा निर्णय न झाल्यास पंतप्रधान मोदींनाही भेटू : शरद पवार
'कर्जमाफीऐवजी केंद्रीय कृषी व अर्थ मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज अथवा शून्य व्याजदराने कर्ज अशी काही मदत करता येईल का हे तपासून पाहत आहाेत. सोमवारी संबंधित मंत्रालयात बैठका लावल्या आहेत. निर्णय घेण्याचे अधिकार कुठे आहेत हे मला माहिती आहे. इथे निर्णय झाले नाही तर पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करू,' असे शरद पवार म्हणाले.

राज्याला स्थिर सरकार देणार
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांत किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. लवकरच यातून तोडगा निघून राज्यात स्थिर सरकार देऊ. मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांनाे खचून जाऊ नका, तुमच्या पाठीशी मी आहे : उद्धव ठाकरे
सांगली : 'शेतकऱ्यांनाे खचू नका, तुमच्या पाठीशी मी आहे,' असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला. तसेच लवकरच भरघोस मदत दिली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे शिवसेनेने दिलेले वचन आहे, त्याची खात्री बाळगा, असेही ते म्हणाले

विमा कंपन्यांना भरला दम
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेलच, यासाठी राज्यातील शिवसैनिक तयार आहेत. खासगी व सरकारी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानीबाबत मदत द्यावी, असा दमही ठाकरेंनी भरला.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने निधीचे वितरण करावे : फडणवीस
मुंबई : भाजपचे विधिमंडळ नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांची भेट घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठीचा निधी तातडीने वितरित करावा, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तातडीने सुरू करून गरजू रुग्णांना उपचारांसाठी अर्थसाह्य करावे, अशा मागण्या फडणवीस यांनी राज्यपालांकडे केल्या.

सर्व पदाधिकाऱ्यांनी दाैरे करावेत
पावसामुळे ३२५ तालुक्यांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. भाजपच्या लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत दिल्या.