Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | all social factors unhealthy due to Center, state government policies : Shinde

केंद्र, राज्य सरकारची धोरणे चुकल्याने सर्वच समाजघटक अस्वस्थ : सुशीलकुमार शिंदे

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 10:18 AM IST

केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे चुकल्यामुळे समाजातील सर्वच घटक अस्वस्थ आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या नि

 • all social factors unhealthy due to Center, state government policies : Shinde

  मोहोळ- केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे चुकल्यामुळे समाजातील सर्वच घटक अस्वस्थ आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांचे शिबिर ऊर्जा देणारे आहेे. अशा शिबिरातून आत्मचिंतन होण्याची गरज आहे. याचा फायदा आगामी निवडणुकीत निश्चित होईल, असेही त्यांनी म्हटले. इंचगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकदिवसीय शिबिरात ते बोलत होते.


  अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील होते. आमदार रामहरी रूपनवर म्हणाले, काँग्रेसने साठ वर्षांत काय केले, असे विचारणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत एका तरी मोठ्या प्रकल्पाची उभारणी केली आहे का? देशाच्या लोकशाहीच्या चारही स्तंभांवर केंद्र सरकारने दबाव निर्माण केला आहे. येत्या निवडणुकीत जातीयवादी शक्तींना सत्तेतून दूर करावे लागेल. तसेच माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, अशोक देशमुख, रफिक पटेल, किशोर पवार, संग्राम चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.


  या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा पाटील, चंद्रभागा कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, प्रकाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, माजी तालुकाध्यक्ष राजेश पवार, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, सुभाष पाटील, शिवाजीराव काळुंगे, नगरसेविका शाहीन शेख, सुलेमान तांबोळी, देवानंद गुंड, किशोर पवार, नागराज पाटील आदी उपस्थित होते. राजेश पवार यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास लक्ष्मण भालेराव, आरिफ पठाण, नीलेश जरग, आकाश राठोड, तानाजी जाधव, विलास तिवारी, सर्जेराव खरात, दीपक दीक्षित, बिरा खरात, किशोर पवार, संजय आठवले, अनिल गवळी, दत्ता सावंत, लक्ष्मण माने, हरिभाऊ काकडे, सिद्धेश्वर वराडे, राजेंद्र मोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


  मोदींनी पूर्ण बहुमत असतानाही प्रश्न सोडवले नाहीत
  शिंदे म्हणाले, सत्तेत आल्यानंतर अनेक प्रश्न लवकर सोडवतो म्हणणाऱ्या मोदींना पूर्ण बहुमत असतानाही त्या प्रश्नांपर्यंत पोहाेचणे अवघड झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील जनता वेठीस धरली गेली. या निर्णयाने व्यापारी आणि उद्योगपतींनी आठवडाभर अगोदरच आपले पैसे बदलून घेतले. पण सर्वसामान्य माणूस भरडला गेला.

Trending