आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व राज्यांनी औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालावी : औषध नियंत्रकांचे निर्देश

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी आणण्याबाबत काेर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा, असे भारतीय औषध नियंत्रकांनी सर्व राज्यांना सांगितले आहे. राॅयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारताने आतापर्यंत औषधांची ऑनलाइन विक्री आणि ई-फार्मसीशी संबंधित कायद्याला अंतिम रूप दिलेले नाही. गेल्या काही वर्षांत मेडलाइफ, नेेटमेड‌्स, टेमसेक फंडेड फार्मायझी आणि सिकाेया कॅपिटल फंडेड १ एमजीसारख्या ऑनलाइन कंपन्यांनी या व्यवसायात चांगलाच जम बसवला असून त्यामुळे पारंपरिक औषध दुकानांचा व्यवसाय धाेक्यात आला आहे. दिल्ली हायकाेर्टाने गेल्या डिसेंबरमध्ये सरकारी औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर तत्काळ बंदी घालावी असा आदेश एका डाॅक्टरांनी केलेल्या याचिकेनंतर दिला हाेता.

२८ नाेव्हेंबरला सर्व राज्यांच्या नियंत्रकांना पाठवली मार्गदर्शक तत्त्वे


सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे (सीडीएससीओ) ज्येष्ठ अधिकारी के. बंगारूराजन म्हणाले, संस्थेने अगाेदरच राज्य सरकारांना काेर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले हाेते. आता सर्व अधिकाऱ्यांना रिमाइंडर पाठवण्यात येत आहे. ते म्हणाले, राज्य औषध नियंत्रण नियामक प्राधिकरण आहे. त्यांनाच हा आदेश लागू करायचा आहे. काेणी ऑनलाइन औषध विक्री करत असेल तर अशा कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे. सर्व राज्यांना सीडीएससीआेकडून २८ नाेव्हेंबरला मार्गदर्शक तत्त्वे पाठवण्यात आली हाेती. राज्य काय कारवाई करू शकतात हे स्पष्ट झालेले नाही.

औषधांचा गैरवापर करण्याचा कंपन्यांवर आराेप


इकीगई लाॅ या कायदा कंपनीचे सीनियर असाेसिएट्स श्रीनिधी श्रीनिवासन म्हणाले की, दिल्ली हायकाेर्टाच्या आदेशानंतर उद्याेगासमाेर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यांच्या औषध नियंत्रकांनी बंदी घातल्यास ऑनलाइन विक्रेत्यांना खूप नुकसान हाेऊ शकते. ई-फार्मा कंपन्यांच्या विराेधात औषध व्यापाऱ्यांची संघटना अनेक वर्षांपासून विराेध करत आहे. हा व्यवसाय त्यांच्या व्यवसायाला आव्हान देत आहे.ऑफलाइन औषध विक्रीची वाढ १२.३ % घटून ८.२ %


ऑनलाइन मंचावर औषधांवर मिळणाऱ्या माेठ्या सवलतीमुळे ऑफलाइन व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. उद्याेगाच्या अंदाजानुसार २०१८-१९ मध्ये १,८४० काेटी डाॅलरची (अंदाजे १.३ लाख काेटी रु.) औषध विक्री झाली. २०१५-१६ नंतर विक्रीतील वाढ केवळ ८.२ % हाेती. त्याआधी ती १२.३ % हाेती. साऊथ केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स असाेसिएशनच्या मते  कंपन्या या मार्जिनपेक्षाी जास्त सवलत देत आहेत.
> आमची कंपनी सर्व भारतीय नियमांचे पूर्ण पालन करत आहे. आमचा व्यवसाय पहिल्यासारखाच सुरू आहे. आमच्या सर्व भागीदार फार्मसींकडे आवश्यक परवानाही आहे.- प्रदीप दाधा, सीईओ आणि फाउंडर, नेटमेड्सफाउंडर, नेटमेड्स

 

बातम्या आणखी आहेत...