आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व 288 आमदार सध्या तरी बिनपगारी नि पूर्णवेळ कारभारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागला. त्याला आता जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला. तथापि अद्यापही राज्यातील एकाही आमदाराला वेतन अथवा भत्ते मिळाले नाहीत. सध्या तरी २८८ आमदारांची भूमिका बिनपगारी, पूर्णवे‌‌‌‌ळ कारभारी अशीच आहे.

धर्माबाद येथील आरटीआय कार्यकर्ते प्रा. डाॅ. एस. एस. जाधव यांनी विधान मंडळ कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. निवडून आलेल्या २८८ आमदारांना कोणते वेतन व भत्ते लागू झालेले आहेत त्याची माहिती शासन अध्यादेशाच्या प्रतीसह देणे व ऑक्टोबर महिन्यात या सर्व नवनिर्वाचित आमदारांना अदा केलेल्या त्यांच्या नावासह वेतन व भत्त्यासह माहिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

विधान मंडळ कार्यालयाने प्रा. जाधव यांच्या माहिती अधिकाराला उत्तर देताना आमदारांना वेतन व भत्ते देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळवले आहे. दि. २४ ऑक्टोबर रोजी निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्याच्या दिनांकापासून अनुज्ञेय आहे. परंतु त्यांना अद्याप अदा करण्यात आलेले नाहीत असे कळवले आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात निवडून आलेल्या सदस्यांना अद्याप वेतन अदा केलेले नाही, असेही विधान मंडळ कार्यालयाने कळवले आहे.

राजकीय अस्थिरतेमुळे आमदार वेतनापासून वंचित

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात जी अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आमदारांना वेतन व भत्त्यापासून वंचित राहावे लागले. २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागला. राज्यातील जनतेने युतीला सरकार स्थापनेचा जनादेश दिला. त्यानुसार युती सरकार सत्तेवर आले असते तर आमदारांना तात्काळ वेतन व भत्ते सुरु झाले असते. परंतु शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करण्याबाबत वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे जवळपास एक महिना कोणते सरकार सत्तेवर येते याचीच चर्चा होत राहिली. त्यामुळे आमदारांचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यानंतर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

वेतन, भत्त्यांचा कालावधी ठरला नाही

आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी झाला. त्यानंतर ते वेतन व भत्त्याला पात्र ठरले. परंतु नवनिर्वाचित आमदारांना कधीपासून वेतन व भत्ते द्यायचे याचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे वेतन व भत्ते आमदारांना अद्यापही मिळू शकले नाहीत. त्यामुळे आमदार सध्या स्वखर्चातून जनसामान्यांची सेवा करीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...