आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - देशातील सर्व राज्याचे राज्यपाल तसेच त्यांनी नेमलेले विद्यापीठांचे कुलगुरू आणि उपकुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधील आहेत, असा आरोप गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘रिव्हिजिटिंग गांधी’ या कार्यक्रमाचे महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते होणारे नियोजित उद्घाटन व भाषण ‘ यांचे विचार नको’ अशी टिप्पणी करत ऐनवेळी रद्द केले. केवळ उपकुलगुरू डाॅ. उमराणीकर यांच्या पत्राच्या दबावापोटी तुषार गांधी यांना उद्घाटनापासून टाळले गेले, असा आरोप करत गांधी स्मारक निधीचे कुमार सप्तर्षी यांनी या प्रकाराचा निषेध केला. त्यामुळे गांधी विचाराचा अपमान झाल्याने पुण्यातील जेष्ठ गांधीवादी मंडळी ही संतापली आहेत.
शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस ‘रिव्हिजिटिंग गांधी’ हा विद्यापीठाकडून २ लाख रुपये खर्च करून कार्यक्रम होत आहे. दरम्यान नियोजित गांधींचे पणतू तुषार गांधी, गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांची भाषण जाणीवपूर्वक टाळत संयोजकांनी आणखी आगीत तेल ओतले. उद्घाटनाच्या कार्यक्रमात बदल करत तुषार गांधी व अन्वर राजन यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पत्राव्दारे कळवल्याने कुमार सप्तर्षी यांनी पत्रक काढून उपकुलगुरू डाॅ. उमराणीकर यांचा निषेध केला. दरम्यान, कार्यक्रमाचा सर्व खर्च सावित्रीबाई फुले विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. पुन्हा तुषार गांधी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊ असे प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे यांनी म्हटले आहे.
संघटनांच्या धमकीनंतर कार्यक्रम रद्द केला
एकीकडे सरकार गांधींचा उदोउदो करते. तर गांधीवादी लोकांना मात्र गांधी सांगण्यापासून दूर ठेवत आहेत. पतित पावन, हिंदू राष्ट्रसेना या संघटनाच्या धमकीनंतर तुषार गांधी आणि अन्वर राजन यांचा विद्यापीठाने आयोजित केलेला मॉडर्न कॉलेजमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला. म्हणून फॅसिस्ट संघटना पर्यायी पोलिस यंत्रणा बनल्या आहेत. देशभक्ती असल्याचे मिरवत इतरांना देशद्रोही ठरवत आहे. विदयापीठ देखील अशा वेळी नेहमीप्रमाणे आपली भूमिका झटकताना दिसते. अशा वातावरणात देश कुठल्या दिशेने जातोय याचा सर्व नागरिकांनी विचार करावा.
कुमार सप्तर्षी, गांधी स्मारक निधी पुणे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.