आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याच सोबत; भाजपचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या संसदीय समितीची बैठक - Divya Marathi
भाजपच्या संसदीय समितीची बैठक

मुंबई - विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आल्यानंतर तो बहुमताने आम्ही सिद्ध करू, असा विश्वास व्यक्त करीत यासाठी बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वसंत स्मृती येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपल्या सोबतच आहेत असा विश्वासही भाजपच्या आमदारांना दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल, खासदार रावसाहेब दानवे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सर्व आमदारांसह भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही या बैठकीत होते. देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आगमन होताच आमदार आणि कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस जिंदाबाद, देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है आणि वंदे मातरम््च्या घोषणा दिल्या. आमच्याकडे सुमारे १७० आमदारांचे संख्याबळ

आमदारांना सत्ता आपलीच आहे. आपल्याकडे जवळ-जवळ १७० आमदारांची ताकद असून आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू, तुम्ही काही काळजी करू नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे उपस्थित आमदारांना सांगण्यात आले. महाविकास आघाडीने आमदारांना डांबून ठेवले 

शेलार म्हणाले, विरोधी पक्षांनी राज्यपाल व राष्ट्रपतींवर अविश्वास दाखवून लोकशाहीला काळिमा फासला आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यानेच ते आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
 

अजितदादाच राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते : शेलार

अजित पवार यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्याच्या प्रश्नावर उत्तर देत ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. त्यामुळे त्यांनाच व्हिप बजावण्याचा अधिकार आहे असेही शेलार यांनी स्पष्ट केले. फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकणार असून त्याबाबतची रणनीती तयार केल्याचेही ते म्हणाले.