आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपविरुद्ध सर्व विरोधकांना एकजूट व्हावे लागेल : चंद्राबाबू नायडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडलेले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, देशाला अराजकापासून वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकजूट व्हावे लागेल. तत्पूर्वी, भाजपच्या विरोधात मोर्चेबंदीसाठी शनिवारी नवी दिल्लीत ते अरविंद केजरीवाल, मायावती, फारुख अब्दुल्ला आणि शरद यादव यांनाही भेटले होते.  


नायडू यांनी रविवारी सकाळी ट्विट करून म्हटले की, “ चार वर्षांपासून झालेले घोटाळे भाजपच्या यशापेक्षा खूप जास्त आहेत. विजय मल्ल्याने ९००० कोटी, नीरव मोदीने ११,५०० कोटी, जतीन मेहताने ७००० कोटी, नितीन संदेसराने ५००० कोटी रुपयांचा घोटाळा केला. लोकांचा पैसा घेऊन हे लोक सहजपणे कसे काय पळून गेले?” नायडू म्हणाले की, शेतकऱ्यांवरील कर्जाचे संकट, भ्रष्टाचार, महिलांवरील हल्ले, सांप्रदायिक हिंसा आणि लोकशाहीवरील गंभीर धोके या मुद्द्यांवर मोदी सरकार खोटे बोलत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...