आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच विस्तारात ठाकरे सरकारचा काेटा फुल्ल; पश्चिम महाराष्ट्र, मुंबई - ठाणे जिल्ह्याला झुकते माप

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • प. महाराष्ट्र १०, मुंबई- ठाणे ९, विदर्भ ८, मराठवाडा- उ. महाराष्ट्र प्रत्येकी ७ मंत्रिपदे
  • तिन्ही पक्षांकडून आपापल्या बालेकिल्ल्याला प्राधान्य

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात सर्वाधिक १० मंत्रिपदे विकासात अग्रेसर असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला मिळाली. त्यानंतर देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या मुंबई- ठाणे परिसराला ९ मंत्रिपदे मिळाली. विकासाचा अनुशेष बाकी असलेल्या विदर्भाला ८ मंत्रिपदे लाभली. तर विकासात कायमच अन्याय झालेल्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला प्रत्येकी ७ मंत्रिपदे लाभली. आदिती तटकरे व उदय सामंत यांच्या रूपाने कोकणाला दाेन मंत्रिपदे मिळाली.

शिवसेना कोटा
पश्चिम महाराष्ट्र -02, मराठवाडा -02, विदर्भ -02, उत्तर महाराष्ट्र -03, मुंबई, ठाणे -05, कोकण- 01 मंत्रिपदे

राष्ट्रवादी कोटा
पश्चिम महाराष्ट्र -06, मराठवाडा -03, विदर्भ -02, उत्तर महाराष्ट्र -02, मुंबई, ठाणे -02, कोकण- 01 मंत्रिपदे

काँग्रेस कोटा
पश्चिम महाराष्ट्र -02, मराठवाडा -02, विदर्भ -04, उत्तर महाराष्ट्र -02, मुंबई, ठाणे -02 मंत्रिपदेतिन्ही पक्षांकडून आपापल्या बालेकिल्ल्याला प्राधान्य
१ गेली पाच वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या काँग्रेसला विदर्भात यंदा चांगले यश मिळाले. त्यामुळे या पक्षाने १२ पैकी सर्वाधिक ४ मंत्रिपदे या विभागाला दिली.
 
२ राष्ट्रवादी काॅंग्रेसला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्री मिळाली आहेत. त्यातील ६ मंत्रिपदे या पक्षाने आपला बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्राला दिली. 


३ मुंबई- ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. येथील महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. हे लक्षात घेत सेनेने १५ पैकी ५ मंत्रिपदे या दाेन शहरांत दिली. तसेच एक मंत्रिपद तळकोकणात दिले.