Home | Business | Personal Finance | all you need to know about pradhan mantri mudra yojana to get advantage of that

पंतप्रधान मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांचे कर्ज, कोणत्याही गॅरंटीची नाही गरज

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 05, 2019, 02:48 PM IST

कर्ज नॉन कॉर्पोरेट लहान व्यवसायासाठी दिले जाते, यात 50 हजारांपासून 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते

 • all you need to know about pradhan mantri mudra yojana to get advantage of that

  बिझनेस डेस्क- देशातील गृह आणि लघू उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे वित्तीय पुर्ण करण्यासाठी भारत सरकारने एप्रिल 2015मध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेला (पीएमएमवाई) सूरूवात केली होती. हे कर्ज नॉन कॉर्पोरेट लहान व्यवसायासाठी दिले जाते. म्हणून मुद्रा लोन शहरी किंवा ग्रामीण क्षेत्रात स्वतःने किंवा पार्टनरशिपमध्ये लहान यूनिट चालवणाऱ्यापासून दुकानदार, छोटा व्यवसाय/व्यापार असणारे छोटी इंडस्ट्रीज चालवणारे कामगार, खाद्य उत्पादनाशी संबंधीत व्यवसाय करणारे आणि सर्विस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ही योजना आहे. हे कर्ज आपण वाणिज्य बॅंक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, मायक्रोफायनांस(सूक्ष्म-वित्त) संस्था आणि आर्थिक कंपनीमध्ये अर्ज करून मिळवु शकता.


  किती मिळेल कर्ज
  मुद्रा लोन अंतर्गत जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.या कर्जला तीन श्रेणीत विभाजित केले आहे. शिशू कर्ज, यात जास्तीत जास्त कर्ज 50 हजार रुपये आहे, किशोर कर्ज, यामध्ये 50 हजारांपासून 5 लाख रूपयांपर्यंत मर्यादा आहे आणि तरुण कर्ज, यात 10 लाख रूपयांची मर्यादा ठेवली आहे.


  कसे मिळेल कर्ज
  या योजने अंतर्गत कोणाताही व्यक्ती ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे. तो कर्ज घेऊ शकतो. यासोबतच जर आपण आपल्या सुरू असल्याला व्यवसायाला आणखी वाढवायचे असेल,तर त्यालाही या योजने अंतर्गत कर्ज मिळू शकते.

  कोठे मिळेल कर्ज
  मुद्रा लोनसाठी त्या सरकारी कार्यालय,बँक किंवा आर्थिक संस्थामध्ये अर्ज करावा लागेल, ज्या मुद्रा लोन देतात. अर्जासोबत आपल्या व्यवसायाची संपुर्ण माहिती प्लॅन आणि इतर आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील.

  किती द्यावे लागेल व्याज
  मुद्रा कर्जाची विशेष बाब म्हणजे यात कोणताच निश्चित व्याजदर ठरवलेले नाही. वेगवेगळ्या बँकेत विविध व्याजदराने कर्ज मिळू शकते. व्याजदर व्यवसायावर अवलंबून असेल. तसेच सामान्यतः व्याजदर 12 टक्के असतो.

  मुद्रा कर्ज घेण्याची संपुर्ण प्रक्रिया


  पहिली पायरी
  सर्वात आधी अर्जदाराला आपल्या व्यवसायाची योजना तयार करावी लागेल. तसेच कर्जासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र जमा करावे लागतील या कागदपत्रासोबतच बँक आपला बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, भविष्यातील इनकम अंदाजासंबंधी कागदपत्र घेईल म्हणजे बँकेला आपल्याला लागणाऱ्या गरजेची माहिती मिळेस. यासोबतच अंदाज लावल्या जाईल की आपला फायदा कसा वाढवता येईल.


  दुसरी पायरी
  मुद्रा लोन देणाऱ्या बँकेचे/आर्थिक संस्थाची निवड करावी लागते. अर्जदार एकापेक्षा जास्त बँकेची निवड करू शकतो. बँकेत कागदपत्रासोबत अॅप्लिकेशन फॉर्म भरून जमा करावा लागेल.


  तीसरी पायरी
  अर्जाची खात्री झाल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्था मुद्रा लोन पास करतील आणि अर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाईल.


  मुद्रा योजनेचे चार मोठे फायदे
  1) योजने अंतर्गत कोणत्याही गॅरंटी शिवाय कर्ज घेतले जाते. 2) यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फिस द्यावी लागत नाही. 3) कर्ज भरण्याचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. 4) मुद्रा लोन घेतेल्या व्यक्तीला मुद्रा कार्ड दिले जाते, याचा वापर व्यवसायिक गरज पडल्यावर येणाऱ्या खर्चावर करू शकतो.


  आवश्यक कागदपत्र
  मुद्रा लोन घेण्यासाठी आपल्या अर्ज केलेल्या फॉर्ममध्ये खालील कागदपत्र जमा करावे लागतील.
  मुद्रा लोनसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र. एकपेक्षा अधिक अर्जदारामध्ये पार्टनरशिपसंबंधी कागदपत्र (डीडी), टॅक्स रजिस्ट्रेशन, बिझनेस लायसेंस इ. कागदपत्रे जमा करावी लागतील. कर्जाची रक्कम, व्यवसायाचे स्वरूप, बँक नियमांच्या आधारे कागदपत्रांची संख्या कमी जास्त असू शकते.

Trending