Home | International | Other Country | Alleged Ghost Image Caught While Clicking Picnic Photos In England

पिकनिकवर Click झालेल्या या एका फोटोमुळे रात्रभर झोपली नाही 3 लेकरांची आई!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 12:02 AM IST

पिकनिकवर तिने आपल्या मुलाचे काही फोटो टिपले होते. घरी येऊन तिने ते फोटो पाहिले तेव्हा ओरडून ते दूर फेकून दिले.

 • Alleged Ghost Image Caught While Clicking Picnic Photos In England

  इंग्लंडच्या नॉर्थम्बरलंडमध्ये एक महिला कुटुंबियांसोबत पिकनिकवरून परतली तेव्हापासून तिची झोपच उडाली आहे. पिकनिकवर तिने आपल्या मुलाचे काही फोटो टिपले होते. घरी येऊन तिने ते फोटो पाहिले तेव्हा ओरडून ते दूर फेकून दिले. त्यापैकी एका फोटोमध्ये तिच्या मुलाच्या मागे एक भयावह चेहरा टिपला आहे. तो एक भूत होता असे तिचे म्हणणे आहे. ही घटना इंग्लंडमध्ये तीन महिन्यांपूर्वी घडली आहे.


  - लॉरा वाटसन नावाची महिला आपल्या मुला-मुलींना घेऊन नुकतीच पिकनिकवर गेली होती. यात लॉरा त्या दोघांचे विविध फोटो टिपले. फोटो काढत असताना त्या ठिकाणी फक्त लॉरा, मुलगा बेरिन (9) मुलगी शार्लोट (15) आणि त्यांचा एक चुलत भाऊ जॅक (16) होता.
  - याच फोटोपैकी एक फोटो तिच्या 9 वर्षीय मुलाचा आहे. त्यामध्ये तो मुलगा एका झाडासमोर हातात बॉल घेऊन थांबला आहे. त्याच मुलाच्या पाठीमागे एक भयावह चेहरा सुद्धा दिसून आला. त्या कथित भूताने मुलाच्या खांद्यावर हात सुद्धा ठेवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते.

  तेव्हापासून झोपलीच नाही...
  लॉरा एक मेडिकल परिचारक आहे. तिने आपल्या मुलाचा तो फोटो पाहिला तेव्हापासून ती प्रचंड घाबरलेली आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, पिकनिकवरून परतल्यानंतर ती हे फोटो संगणकावर अपलोड करत होती. त्याचवेळी हा फोटो दिसून आला. भूताटकी चेहरा पाहून फक्त तीच नव्हे, तर तिच्या घरात सगळेच बेचैन आहेत. फोटो पाहिला त्या दिवशी तिच्या पतीची नाइट शिफ्ट होती, त्यामुळे तिने अख्खी रात्र जागून काढली आहे. यानंतरही तिला झोप येत नाही. यापूर्वी कधीही भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता. पण, पिकनिकच्या घटनेनंतर मी झोपलेच नाही असे तिने सांगितले. ती ज्या पार्कमध्ये मुला-मुलींसोबत गेली होती, काही वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी असलेल्या नदीत कथितरीत्या बुडून एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, हे भूत त्याचेच असावे असे तिचे म्हणणे आहे.

 • Alleged Ghost Image Caught While Clicking Picnic Photos In England
 • Alleged Ghost Image Caught While Clicking Picnic Photos In England
 • Alleged Ghost Image Caught While Clicking Picnic Photos In England

Trending