आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alleged Rafale Deal Scam Files Kept In Parrikar\'s Bedroom Claims Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रफाल घोटाळ्याच्या सर्वच फायली मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये, काँग्रेसने लावला गंभीर आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रफाल विमान व्यवहार प्रकरणात काँग्रेसने भाजप आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर खळबळजनक आरोप लावले आहेत. कथित गैरव्यवहाराच्या सर्वच फायली तत्कालीन संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये आहेत. गंभीर आजारी असतानाही पर्रिकर विविध ठिकाणी दौरे करून मुख्यमंत्री पदावर टिकून आहेत अशा शब्दातही काँग्रेसने भाजपवर टीका केली. सोबतच, पर्रिकरांनी कथितरित्या आपले कुणी काहीही बिघडवू शकणार नाही असे म्हटले होते. कारण, रफाल घोटाळ्याच्या सर्वच फायली त्यांच्याकडेच आहेत असा आरोप काँग्रेसने लावला आहे.

 

शिवसेनेकडून पर्रिकरांचे कौतुक

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर आहे. आजारपणातही विविध कार्यक्रमांना हजेरी लावून विरोधकांनाही बोलके केले आहे. विरोधक त्यांच्या या दौऱ्यांवर टीका करत असताना शिवसेनेने त्यांच्या कार्याचे कौतुक केले. काम न करणाऱ्या मंत्र्यांनी पर्रिकरांचा आदर्श घ्यावा असे शिवसेनेने म्हटले आहे. कित्येक दिवस उपचारासाठी सार्वजनिक सभांमधून गैरहजर राहणारे पर्रिकर सोमवारी आपल्या सचिवालयात दिसून आले. त्यांनी सचिवालयात जाऊन राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला.

 

मोदींसोबत फ्रान्सला संरक्षण मंत्री नव्हे, अंबानी गेले होते - काँग्रेस
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "जेव्हा चौकीदार पॅरिसला गेले होते, तेव्हा देशाचे संरक्षण मंत्री गोव्यात मच्छी विकत घेत होते. मोदींच्या डेलिगेशनमध्ये संरक्षण मंत्री नाही, तर अनिल अंबानी होते. रफाल घोटाळ्यातील भाजपच्या मंत्र्यांनीच यासंदर्भात पोल-खोल केली. पर्रिकरांना कुणी काहीही करू शकणार नाही. कारण रफालच्या सर्व फायली त्यांच्या बेडरुममध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या याच कहाणीसाठी चौकीदार जेपीसी चौकशीपासून वाचत आहेत. यामुळेच रफाल डीलशी संबंधित कुठलेही कागदपत्र संसदीय समितीला ते दाखवू इच्छित नाहीत का?"