आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alliance Fear Of Outgoing, Hope Of Incoming To Congress cnp; Watch On Candidates

युतीला आऊटगाेइंगची धास्ती, आघाडीस इनकमिंगची आशा; उमेदवारांवर ‘नजर’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीत गुरुवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या काेअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेते उपस्थित हाेते. - Divya Marathi
नवी दिल्लीत गुरुवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या काेअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेते उपस्थित हाेते.

नागपूर - भाजप-शिवसेना युती हाेणार हे निश्चित असून जागावाटपाचा फाॅर्म्युलाही निश्चित झालेला आहे. मात्र दाेन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या माेठी असल्याने जागावाटप जाहीर झाल्यानंतर बंडखाेरीची भीती उभय पक्षांना वाटत आहे. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा निर्णय लांबवण्यात येईल, असे संकेत भाजपमधून देण्यात येत आहेत. युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांच्याकडे उमेदवारी न मिळालेले  नेते आपल्याकडे येतील, अशी काँग्रेस- राष्ट्रवादीला आशा आहे. म्हणून त्यांनीही आघाडीच्या उमेदवारांची घाेषणा ‘हाेल्ड’वर ठेवली आहे. दरम्यान, उमेदवारांची घोषणा झाल्यावर नाराज नेत्यांना बंडखोरीसाठी जास्त वेळ मिळू नये यासाठी युतीतील दोन्ही पक्षांकडून काळजी घेण्यात येत असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केला.
 
निवडणुकीची अधिसूचना निघण्याचा दिवस जवळ येत असताना भाजप आणि शिवसेनेकडून कुठलीही अधिकृत घोषणा होत नसल्याने संभाव्य उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. यापूर्वी जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद दिसून आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी फिफ्टी-फिफ्टीचे सूत्र ठरवण्यात आले हाेते. मात्र ते आता लागू हाेईल का, याबाबत सेनेला शंका वाटते.
 

संभाव्य बंडखाेरांची कोंडी करण्यावर युतीचा भर
भाजप-शिवसेनेतील नाराज नेत्यांवर  काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी गळ टाकून बसली आहे. धनंजय मुंडे यांनी युतीतील बंडखोरांवर आमचे लक्ष असल्याचे विधान जाहीरपणे केले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत युतीचे उमेदवार जाहीर न करण्याची रणनीती सेना- भाजपने आखली आहे.  ते शक्य न झाल्यास संभाव्य बंडखोरांना फार हालचाली करण्याची संधी मिळू नये, असे उभय पक्षांचे प्रयत्न आहेत.  जागावाटपात दोन्ही पक्षांच्या सीटिंग जागा ज्याच्या त्याच्याकडेच ठेवण्यात आल्याचा दावाही भाजपने एका नेत्याने केला आहे.
 

आघाडीचे जागावाटप रेंगाळले
काँग्रेस- राष्ट्रवादीने प्रत्येकी १२५ जागा वाटून इतर ३८ जागा छाेट्या मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुमारे ५६ मित्रपक्षांची भलीमाेठी यादी या दाेन्ही काँग्रेससाेबत असल्याने त्यांचे ३८ एवढ्या कमी जागांवर समाधान हाेताना दिसत नाही. अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसवर अजून दबाव वाढवून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न हे छाेटे पक्ष करत आहेत. यात राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्ष आघाडीवर असल्याचे दिसते.
 

काँग्रेसचीही दिल्लीत खलबते
दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठका सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनीही राजधानीत तळ ठाेकला आहे. पितृपक्ष संपण्यास अवघे दाेन दिवस शिल्लक आहेत. ताेपर्यंत उमेदवारांची नावे अंतिम करून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ती जाहीर करण्याचा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा मानस आहे. गुरुवारी दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली त्यात उमेदवारांच्या नावावर खल झाला.  शुक्रवारीही केंद्रीय समितीच्या बैठकीत या विषयावर निर्णय हाेण्याची शक्यता आहे.