आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती, आघाडीसाठी बंडाेबांची डाेकेदुखी; आज फैसला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : युती-आघाडीत सारे काही आलबेल असल्याचा दावा चारही प्रमुख पक्षांचे नेते करत असले तरी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी उभारलेल्या बंडांच्या झेंड्यांमुळे हे दावे फाेल ठरले आहेत. बंडखाेरी टाळण्यासाठी शिवसेनेने अद्यापही आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांचे हे प्रयत्नही उपयाेगी पडले नाहीत. आता या बंडाेबांची मनधरणी करण्यासाठी सर्वच पक्षीय नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

उमेदवारी अर्ज माघारीचा साेमवारी शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी काेण माघार घेताे व काेण रिंगणात कायम राहताे, यावर बहुतांश मतदारसंघातील राजकीय गणित अवलंबून आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत बंडखोरांना शांत केले जाईल, असा दावा केला हाेता. जे बंडखोर शांत होणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा इशाराही दिला आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांद्रे येथील मेळाव्यात बंडखोरी खपवून घेतली जाणार नसल्याचे शिवसैनिकांना कडक भाषेत सुनावले हाेते. असे असले तरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपकडून तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेते आपापल्या पक्षातील बंडखाेरांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचीही बैठक झाली, त्यात कुठे काेणी माघार घ्यायची यावर खल झाल्याची चर्चा आहे. काही मतदारसंघात दाेन्ही काँग्रेसने आयात उमेदवारांना संधी दिल्यामुळे निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले असल्याचे दिसते.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस; सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार मनधरणीचे नाट्य.... 
महाआघाडीतील बंडखोरी : काँग्रेस- राष्ट्रवादीने केली एकमेकांचीच का
ेंडी
सोलापूर शहर म. - प्रणिती (काँग्रेस) विरुद्ध जुबेर बागवान (राष्ट्रवादी)
सांगोला - शेकापचे अनिकेत देशमुख विरुद्ध दीपक साळुंखे (राष्ट्रवादी)
पर्वती - राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम विरुद्ध आबा बागूल (काँग्रेस)
मानखुर्द गोवंडी - सपाचे अबू आझमी विरुद्ध सुफियान वणू (काँग्रेस)
भिवंडी - सपाचे रईस शेख विरुद्ध संतोष शेट्टी (काँग्रेस)
अलिबाग - काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर विरुद्ध मधुशेठ ठाकूर यांच्या कुटुंबातील दाेन अर्ज
नगर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे किरण काळे (वंचितकडून)
पंढरपूर - राष्ट्रवादीचे भारत भालके विरुद्ध शिवाजी काळुंगे (काँग्रेस)
हिंगणघाट - राष्ट्रवादीचे राजू तिमांडे विरुद्ध सुधीर कोठारी (राष्ट्रवादी)
शिरोळ - स्वाभिमानीचे मदन नाईक विरुद्ध राजेंद्र पाटील-यड्रावकर (राष्ट्रवादी)

भाजप उमेदवारांविरोधात बंडखोरी : २६ मतदारसंघांत स्वकीय तथा शिवसेनेच्या उमेदवारांकडून आव्हान
औसा - अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेनेचे दिनकर माने
यवतमाळ - मंत्री मदन येरावार विरुद्ध शिवसेनेचे संतोष ढवळे
रामटेक - मल्लिकार्जुन रेड्डी विरुद्ध शिवसेनेचे आशिष जैस्वाल
वाशीम - लखन मलिक विरुद्ध शिवसेनेचे नीलेश पेंढारकर
जत - आ. विलास जगताप विरुद्ध डॉ. रवींद्र आरळी
मिरज - मंत्री रेश खाडे विरुद्ध भाजपच्याच शुभांगी देवमाने
शिराळा - आ. शिवाजीराव नाईक विरुद्ध भाजपचे सम्राट महाडिक
सांगली - आ. सुधीर गाडगीळ विरुद्ध भाजपचेच शिवाजी डोंगरे
वाई - मदन भोसले विरुद्ध शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव
अहमदपूर - विनायक पाटील विरुद्ध भाजपचेच दिलीप देशमुख
आष्टी - भीमराव धोंडे विरुद्ध भाजपचेच जयदत्त धस
कणकवली - नितेश राणे विरुद्ध सेनेचे सतीश सावंत, भाजपचे पारकर
पेण - रवीशेठ पाटील विरुद्ध शिवसेनेचे नरेश गावंड
कल्याण पूर्व - आ. गणपत पाटील विरुद्ध शिवसेनेचे धनंजय बोडारे
नाशिक प. - सीमा हिरे विरुद्ध सेनेचे विलास शिंदे, सुधाकर बडगुजर
नाशिक पूर्व - राहुल ढिकले विरुद्ध भाजपचे आमदार बाळासाहेब सानप (आता राष्ट्रवादीमध्यम)
मुक्ताईनगर - रोहिणी खडसे विरुद्ध सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील
नंदुरबार - विजयकुमार गावित विरुद्ध भाजप आ. उदयसिंग पाडवी
मावळ - मंत्री बाळा भेगडे विरुद्ध भाजपचे सुनील शेळके
खडकवासला - भीमराव तापकी विरुद्ध शिवसेनेचे रमेश कोंडे
कसबा - मुक्ता टिळक विरुद्ध शिवसेनेचे विशाल धनवडे
माण - जयकुमार गोरे विरुद्ध शिवसेनेचे शेखर गोरे (सख्खे भाऊ)
वर्सोवा - शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर विरुद्ध सेनेचे राजुल पटेल
मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता विरुद्ध भाजपच्या गीता जैन
ऐरोली - गणेश नाईक विरुद्ध शिवसेनेचे विजय नाहटा
पंढरपूर - रयतचे सुधाकर परिचारक विरुद्ध भाजपचे समाधान अाैताडे, शिवसेनेच्या शैला गोडसे.

शिवसेनेविरोधात बंडखोरी : २५ मतदारसंघांत भाजपकडून आव्हान
अंधेरी - रमेश लटके विरुद्ध भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल
वांद्रे पूर्व - विश्वनाथ महाडेश्वर विरुद्ध शिवसेना आमदार तृप्ती सावंत
भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे विरुद्ध भाजपच्या संतोष शेट्टी
कल्याण प. - विश्वनाथ भोईर विरुद्ध भाजपचे आमदार नरेंद्र पवार
खेड दापोली - योगेश कदम विरुद्ध भाजपचे केदार साठे
सावंतवाडी - मंत्री दीपक केसरकर विरुद्ध भाजपचे राजन तेली
गुहागर - भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे विनय नातू, सेनेचे सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)
चिपळूण - सदाशिव चव्हाण विरुद्ध भाजपचे तुषार खेतल
देवळाली - योगेश घोलप विरुद्ध भाजपच्या सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
चोपडा - लताबाई सोनवणे विरुद्ध भाजपचे मगन सैंदाणे, श्यामकांत सोनवणे
अक्कलकुवा - आमशा पाडवी विरुद्ध भाजपचे नागेश पाडवी
बुलडाणा - संजय गायकवाड विरुद्ध शिवसेनेचे विजयराज शिंदे (वंचितकडून)
सिल्लोड - अब्दुल सत्तार विरुद्ध प्रभाकर पालोदकर (भाजप पाठिंबा)
वैजापूर - रमेश बाेरनारे विरुद्ध भाजपचे एकनाथ जाधव, दिनेश परदेशी
पालघर - श्रीनिवास वनगा विरुद्ध शिवसेना आमदार अमित घोडा (राष्ट्रवादी)
बोईसर - विलास तरे विरुद्ध भाजपचे संतोष जनाठे
शहापूर - पांडुरंग बरोरा विरुद्ध शिवसेनेचे दौलत दरोडा (राष्ट्रवादीकडून)
उरण - मनोहर भोईर विरुद्ध भाजपाचे महेश बालदी
पिंपरी - गौतम चाबुकस्वार विरुद्ध भाजपचे अमित गोरखे
कागल - संजय घाटगे विरुद्ध भाजपचे समरजित घाटगे
माढा - संजय कोकाट विरुद्ध भाजपच्या मीनलताई साठे
करमाळा - रश्मी बागल विरुद्ध शिवसेनेचे आमदार नारायण पाटील
इस्लामपूर - गौरव नायकवाडी विरुद्ध भाजप नेते निशिकांत पाटील
श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे विरुद्ध शिवसेनेचे खासदारपुत्र चेतन लोखंडे
लातूर - ग्रामीण सचिन देशमुख विरुद्ध भाजपचे रमेश कराड

बातम्या आणखी आहेत...