आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइनला विरोध करायला सर्वपक्षीय एकत्र; ऑफलाइन अर्ज घ्यायला दिली मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - अाॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे इच्छुकांची प्रचंड तारांबळ उडाली. सर्व्हर डाऊनचा त्रास साेसावा लागला. साेमवारी अखेर या इच्छुक उमेदवारांच्या संतापाचा स्फाेट झाला. सगळ्याच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अायुक्त देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर निवडणूक अायाेगाशी बाेलून अाॅफलाइन अर्ज देण्याचा ताेडगा काढण्यात अाला. यामुळे त्रस्त उमेदवारांना दिलासा मिळाला. साेमवारी दुपारपासून अाॅफलाइन अर्ज भरायला प्रारंभ करण्यात अाला.

 

उद्या मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस अाहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केले नाही. त्यामुळे मंगळवारी एकच गर्दी हाेईल.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याची तक्रार शनिवारपासून इच्छुक उमेदवारांनी महापालिका अायुक्त तसेच निवडणूक अायाेगाच्या अधिकाऱ्यांकडे केली. लेखी स्वरूपातही काही तक्रारी हाेत्या. शनिवारपासून अॉनलाइन अर्ज भरायला तांत्रिक अडचणी येत होत्या. रविवारी सुटीच्या दिवशी तर सर्व राजकीय कार्यालयांमध्ये व खासगी सायबर कॅफेत उमेदवारी अर्ज भरायला गर्दी झाली हाेती; परंतु आयोगाच्या संकेतस्थळावरून अर्ज भरताना एकेक रकाना भरण्यासाठी तासभर वेळ लागत होता.

 

यात गुन्हेगारी तसेच उत्पन्नाची माहिती भरताना अडचणी येत होत्या. तर फायनल सबमीट होत नसल्याने त्याची प्रत मिळत नव्हती. निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष प्रत व ऑनलाइन सबमीट झाल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. साेमवारी सकाळी तीच परिस्थिती हाेती. वेळ कमी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहणारे राजकीय पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी यासाठी एकत्र आले. सगळ्यांनी मिळून आयुक्त सुधाकर देशमुख यांचे कार्यालय गाठले.

 

या वेळी भाजपचे तेजस गोटे, िहरामण गवळी, अॅड.अमित दुसाने, संजय बोरसे, दिलीप साळंुखे, शिवसेनेचे भरत मोरे, अनिल दामोदर, िफरोज शेख, सिद्धार्थ जगदेव, अनिल मुंदडा,महेश घुगरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जात ऑनलाइनसाठी तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने अर्ज आॅफलाइन स्वीकारण्यात यावा अशी मागणी केली. या वेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांचे विषयावर निवडणूक आयोगाच्या आयटी विभागाशी बोलणे झाले. तसेच आयाेगाला लेखी कळवण्यात आले. यावेळी निवडणूक कार्यालयाशी प्रत्यक्ष तेथेच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व सर्व परिस्थिती कळवली. यासर्व प्रकारानंतर तासाभरात िनवडणूक आयोगाने दुपारी दीड वाजता ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली.


ऑनलाइनमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारांची दिवसभर तारांबळ; आजपासून प्रशासन आॅफलाइन अर्ज स्वीकारणार
जुन्या मनपात चलन भरताना अडचणी...
ऑनलाइन अर्ज भरताना अनेकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे सुरू होत्या. त्यातच दाखले व प्रमाणपत्रासाठी बंॅक काउंटरवर चलन भरणे सुरू असताना तेथील सर्व्हरची वायर तुटल्याने ती सेवा काही वेळ खंडित झाल्याने उमेदवारांनी चलन भरता येत नसल्याने अर्ज दाखल करता येत नाही. याकरिता मनपा आवारात तीव्र नाराजी व्यक्त करून निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी त्यांना रोखले होते.


तक्रारीसाठी आयुक्तांच्या फोनवर भडिमार
मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज ऑनलाइल भरताना सोमवारी पुन्हा सकाळपासूनच अडचणी येत होत्या. तसे रविवारपासून हे सुरू होते. त्याकरिता उमेदवार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सतत आयुक्तांना मोबाइलवर तक्रारी करीत होते. सोमवारी दुपारपर्यंत सतत मोबाइल वाजत होता. मात्र ऑफलाइनचे कळवल्यानंतरच तक्रारी थांबल्या.


५३ उमेदवारी अर्ज दाखल; पाच जणांना मिळते परवानगी
अनेकांनी भरले दोन अर्ज; भाजपतर्फे सर्वाधिक अर्ज
महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी सातव्या दिवशी ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये काही जणांनी दाेन अर्ज दाखल केले अाहेत. छाननीत अर्ज बाद झाल्यास पर्याय म्हणून दाेन अर्जांची व्यवस्था केली. भाजपतर्फे सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात अाले.
महापालिका निवडणुकीतील अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली. त्यातही राजकीय पक्षांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही. राजकीय पक्षात नव्याने प्रवेश केलेले उमेदवार त्याच पक्षाच्या नावाने अर्ज दाखल करीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार त्यांच्या समर्थकांसह वाजत गाजत येत होते; परंतु अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी हाेती. याकरिता कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त व बॅरिकेट‌्स लावण्यात आले. आवारातून कार्यालयात केवळ चार ते पाच जण जात होते. मनपाच्या जुन्या इमारतीत दोन निवडणूक कार्यालय आहेत. या ठिकाणी उमेदवार व नागरिकांची गर्दी होती. तसेच नवरंग जलकुंभ निवडणूक कार्यालयातही गर्दी होती. तर शाळा क्रमांक पाचमध्ये शुकशुकाट दिसून आला. सोमवारी मुदतीत दुपारी ३ वाजेपर्यंत ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये प्रभाग २ अ मधून भाजपतर्फे सुनील साेनर यांनी अर्ज भरला आहे. सुनील सोनार यांनी अगोदरही अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ३ अ मधून शिवसेनेतर्फे देविदास लोणारी, क मधून भाजपतर्फे रत्ना राजेंद्र काळे, ड मधून रफिक हाजी लुकमान पठाण व भाजपतर्फे सुबाेध पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक अ मधून भाजपतर्फे नागसेन बोरसे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक ५ ब मधून शिवसेनेतर्फे सुनीता पाटील व ड मधून भाजपतर्फे भगवान गवळी व शिवसेनेतर्फे राजेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्रभाग क्रमांक ७ ड मधून भाजपतर्फे 
हर्षकुमार राधेश्याम रेलन यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक ८ ब मधून भाजपतर्फे लिना नीलेश काटे यांनी भाजपतर्फे तर प्रभाग ८ ड मधून भाजपतर्फे मयूर कंड्रे यांनी अर्ज दाखल केला आहे.

 

प्रभाग क्रमांक ९ ब मधून विद्यमान स्थायी समिती सभापती बिरबालादेवी मंडोरे यांनी भाजपतर्फे अर्ज दाखल केला आहे. या अगोदरही अर्ज दाखल असून सोमवारी दुसऱ्यांदा अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ११ ड मधुन राष्ट्रवादी कांॅग्रेस पार्टीकडून रजनिश निंबाळकर व भाजपतर्फे माजी नगरसेवक प्रदीप कर्पे यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक १४ ड मधून राष्ट्रवादी कांॅग्रेस पक्षातर्फे नगरसेवक संदीप पाटाेळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक १५ अ मधून नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांची कन्या पूनम शिरसाठ यांनी ब मधून संगीता प्रशांत श्रीखंडे, क मधून जितेंद्र घाेरपडे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक १५ क मधून भाजपतर्फे नगरसेवक संजय जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. याच प्रभागात ड मधून भारिप बहुजन महासंघातर्फे सिध्दार्थ संतोष पारेराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

प्रभाग क्रमांक १७ अ मधून भाजपतर्फे अमाेल मासुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तुषार पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. ब मधून भाजपर्फे सुरेखा उगले व वंदना राजेंद्र मराठे तर क मधूनही सुरेखा उगले व वंदना मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक १७ ड मधुन भाजपतर्फे शीतल मोहन नवले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे चारुदत्त राजपूत यांनी तर अपक्ष म्हणून प्रशांत नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक १८ क व ड मधून नगरसेविका सारिका अग्रवाल यांनी दोन जागेवरुन भाजपतर्फे अर्ज दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...