आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप; छगन भुजबळांना मिळाला आवडता रामटेक, सुभाष देसाई, थाेरात वेटिंगवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षा की मातोश्री : बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर अखेर सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले आहे. चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले असून त्यात शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या तीन मंत्र्यांना अद्याप बंगल्याचे वाटप झालेले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार की “मातोश्री’ या त्यांच्या खासगी निवासस्थानी राहणार याबाबत उत्सुकता आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी जे जे करावे लागणार ते मी करणार, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “वर्षा’नंतर दुसरा महत्त्वाचा बंगला म्हणजे “रामटेक’. समुद्रकिनारी असलेला रामटेक हा आलिशान सरकारी बंगला मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच असते. याआधी एकनाथ खडसे या बंगल्यामध्ये राहायचे. मात्र, ते हा बंगला सोडून गेल्यापासून येथे कोणताही नेता राहण्यास तयार नव्हता.रॉयल स्टोनमध्ये राहणार एकनाथ शिंदे


माजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे सरकारी निवासस्थान असलेला “सेवासदन’ हा बंगलाही त्यांना आता खाली करावा लागणार आहे. “सेवासदन’ हा मलबार हिल परिसरातील बंगल्यात आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना देण्यात आला आहे. राज्याच्या माजी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही त्यांचा “रॉयल स्टोन’ बंगला खाली करावा लागणार आहे. रॉयल स्टोन’ या बंगल्यात आता शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राहणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांना मिळाला सागर बंगला  


माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर बंगला देण्यात आला आहे. सागर हा नेपियन्स रोडवरील अालिशान बंगला त्यांना देण्यात आला आहे. मंत्रिपदावर असेपर्यंत मंत्र्यांना या शासकीय बंगल्यांमध्ये निवास करता येतो. पदमुक्त झाल्यानंतर वाटप केलेले निवासस्थान १५ दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणे बंधनकारक असते. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सो. ना. बागूल यांनी राज्यपालांच्या नावाने बंगला वाटपाचा शासन निर्णय आज जाहीर केला आहे. 

वर्षा की मातोश्री :


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या शासकीय निवासस्थानी राहावयास आले तर मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाचे महत्त्व कमी होईल. मातोश्री हे पाॅवर सेंटर म्हणून ओळखले जाते. म्हणून उद्धव वर्षावर राहावयास जाणार नाहीत, असा शिवसेनेतील नेत्यांचा दावा आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...