आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Allu Arjun Appeals To The Government, Saying 'Dad Gave 45 Years To Telugu Industry, If Possible Please Honour Him With Padma Shri'

अल्लू अर्जुनने सरकारला केली अपील, म्हणाला - 'वडिलांनी तेलगु इंडस्ट्रीला 45 वर्षे दिली, शक्य असेल तर पद्मश्री द्यावा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तेलगु सुपरस्टार अल्लू अर्जुन एका कार्यक्रमादरम्यान पिता अल्लू अरविंद यांना पाहून भावुक झाला. इंग्रजी वेबसाइट कोइमोइनुसार, त्याने पाहुण्यांमध्ये बसलेल्या वडिलांसाठी पद्मश्रीची मागणी केली. तो म्हणाला की, माझ्या वडिलांनी तेलगु फिल्म इंडस्ट्रीला 45 वर्षे दिली आहेत. ते दक्षिण भारतातील पहिल्या क्रमांकाचे निर्माते आहेत. 


अल्लू अरविंद साउथचे मोठे निर्माते आहेत आणि प्रसिद्ध अभिनेता अल्लू रामलिंगैया यांचे पुत्र आहेत. त्यांची कंपनी गीता आर्ट्सने 'मगधीरा' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. अल्लूचा चित्रपट 'आला बैकुंठपुर्रमलु' 12 जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात त्याच्याव्यतिरिक्त पूजा हेगडे आणि तब्बुदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  


अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटादरम्यान म्यूझिक कॉन्सर्टदरम्यान अभिनेता आपल्या वडिलांबद्दल बोलत असताना अचानक रडायला लागला. तो म्हणाला की, 'मला हे बोलण्याची संधी याअगोदर कधी नाही मिळाली, पण आज हे सांगू इच्छितो की, मी जगात सर्वात जास्त प्रेम माझ्या वडिलांवर करतो.' तो म्हणाला, 'तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यासाठी खूप खूप आभार.' 

माझ्या वडिलांना सर्वात खूप समजले गेले... 


अभिनेत्याने सांगितल्यानुसार, 'माझ्या वडिलांना या जगात खूप जास्त चुकीचे समजले गेले आहे. ते एक महान वडिलच नाही तर एक उत्तम व्यक्तीदेखील आहेत.' त्यांने आपल्या आजोबांच्या आठवणीला उजाळा देत सांगितले की, 'माझ्या आजोबांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले होते. मी तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा कोणत्याही सरकारला विनंती करतो की, शक्य झाले तर माझ्या वडिलांनाही हा सन्मान द्यावा, कारण ते यासाठी योग्य आहेत.' अभिनेता म्हणाला की, 'माझ्या वडिलांनी तेलगु इंडस्ट्रीसाठी खूप काही केले आहे.' 

बातम्या आणखी आहेत...