Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Almonds for the skin, and carrots beneficial for eye health

त्वचेसाठी बदाम, तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर फायदेशीर

रिलिजन डेस्क, | Update - Aug 06, 2019, 12:05 AM IST

दररोज आहारात काही खास वस्तूंचा समावेश आवश्य करा, जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल. 

 • Almonds for the skin, and carrots beneficial for eye health

  आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. शरीरामध्ये याची कमतरता झाल्यास आजार वाढण्याची शक्यता असते. म्हणून दररोज आहारात काही खास वस्तूंचा समावेश आवश्य करा, जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल.


  १. त्वचेसाठी बदाम
  हे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स अाणि खनिजांची कमतरता दूर करते. त्वचेसंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी हे लाभदायी आहे. रोज सकाळी उठून रातभर भिजवलेले बदाम खा. बदामाचे दूधदेखील पिऊ शकता. नियमितपणे प्यायल्यास त्वचेची चमक वाढते. बदामाचे दूध बनवण्यासाठी रात्रभर बदाम भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर बदामाची साल काढून घ्या. ब्लेंडरमध्ये पाणी व साल काढलेले बदाम टाकत वाटून घ्या. हे थंड किंवा गरम करून प्या.


  २. अक्रोडमुळे मेंदू राहील निरोगी
  मेंदू निरोगी राखण्यासाठी अक्रोड आणि मासे खाणे फायद्याचे ठरेल. यामध्ये पुरेशा प्रमाणात असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड मेंदू सक्षम करतात. याचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. ज्या लोकांना डिप्रेशन आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये अक्रोडचा समावेश केला पाहिजे. यामुळे मूड चांगला राहतो आणि मेंदूला ताकद मिळते.


  ३. डोळ्यांसाठी गाजर
  डोळ्यांसाठी गाजर अत्यंत फायद्याचे आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन इत्यादी पुरेशा प्रमाणात असतात. हे घटक डोळ्यांचे आरोग्य कायम राखण्यास मदत करतात. सोबतच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे डोळे निरोगी राहण्यासोबतच मोतीबिंदू आणि ग्लुकोमापासूनही बचाव होतो.


  ४. हातापायांसाठी ब्रोकली
  ब्रोकलीचे सेवन हाडांच्या बळकटीसाठी फायद्याचे ठरते. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे ब्रोकली हाडांसाठी सर्वाधिक फायद्याची आहे. याशिवाय बदाम, डार्क चॉकलेट, टोफू आणि पालकाचेही सेवन करावे. यामुळे हातपायांना बळकटी मिळते.


  ५. हृदयासाठी टोमॅटो
  हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी टोमॅटो फायद्याचे ठरते. यामध्ये पुरेशा प्रमाणात असलेले पोटॅशियम हृदय निरोगी ठेवते. रोज टोमॅटोचा ज्यूस पिल्याने बॅड कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो. हृदयासंबंधी आजारांपासून बचाव करण्यासाठी टोमॅटोचे सूप प्यावे. टोमॅटो सलाडच्या रूपातही खाऊ शकता.


  ६.पोटाच्या आरोग्यासाठी आले
  आले पोटासाठी सर्वात उपयुक्त सुपरफूड आहे. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंट्री आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आले खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. भाजीत आले वाटून टाकावे. पावसाळ्यात रोज आल्याचा चहा घ्यावा.

Trending